तंबाखूमुक्त पोलीस ठाण्यांना गुण

By admin | Published: May 23, 2015 01:35 AM2015-05-23T01:35:14+5:302015-05-23T01:35:14+5:30

पोलीस हे नेहमीच सतर्क राहून सगळ््यांचे संरक्षण करतात. दुसऱ्यांचे संरक्षण करणाऱ्यांनी स्वत:चे संरक्षण करणेही गरजेचे आहे.

Points to Tobacco-Free Police Stations | तंबाखूमुक्त पोलीस ठाण्यांना गुण

तंबाखूमुक्त पोलीस ठाण्यांना गुण

Next

मुंबई : पोलीस हे नेहमीच सतर्क राहून सगळ््यांचे संरक्षण करतात. दुसऱ्यांचे संरक्षण करणाऱ्यांनी स्वत:चे संरक्षण करणेही गरजेचे आहे. पोलिसांमध्ये तंबाखूच्या व्यसनाचे प्रमाण खूप आहे. हे प्रमाण शून्य टक्क्यावर यायला हवे. जे पोलीस ठाणे तंबाखूविरहित होईल, त्यांना वार्षिक गुणवत्ता तपासणीत चांगले गुण देण्यात येतील, असे सहआयुक्त (कायदे आणि सुव्यवस्था) देवेन भारती यांनी सांगितले.
जागतिक तंबाखूविरोधी दिन (३१ मे) निमित्ताने आझाद मैदान येथील पोलीस क्लबमध्ये कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनच्या (सीपीएए) तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तंबाखूविरहित पोलीस ठाणे या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली. अभिनेता विवेक ओबेरॉय, रवीना टंडन, सहआयुक्त (प्रशासकीय) अनुपकुमार सिंग, माजी पोलीस महासंचालक पी. एस. पसरिचा, सीपीएएचे अध्यक्ष वाय. के. सप्रू उपस्थित होते.

पोलिसांनी घेतली शपथ!
आम्ही मुंबई पोलीस, जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतो. म्हणूनच समाजाच्या, परिवाराच्या सुरक्षेसाठी, भल्यासाठी आम्ही तंबाखूसेवन करणार नाही. आजपासून आम्ही तंबाखू खाणार नाही, अशी शपथ पोलिसांनी या वेळी घेतली

तीन पोलिसांचा सत्कार
या कार्यक्रमादरम्यान तीन पोलिसांनी पुढे येऊन यापुढे आम्ही तंबाखूचे सेवन करणार नाही, असे सांगितले. या तिघांचा मानचिन्ह आणि बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Points to Tobacco-Free Police Stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.