मुंबई : पालिकेच्या बी विभाग कार्यालयातील कँटीनमधील खाद्यपदार्थांतून तेथील कर्मचाऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी घडली. या १० रुग्णांवर शुक्रवारी जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यात ६ पुरुष व ४ महिलांचा समावेश होता. उपचारानंतर या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जे.जे. रुग्णालय प्रशासनाने दिली.या प्रकरणातील बी विभागाच्या कार्यालयात काम करणारे सहअभियंता कृष्णकांत धनावडे यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे कँटीनमध्ये नाश्ता करण्यासाठी गेलो. त्या वेळी कँटीनमध्ये डोसा खाल्ला. मग कामाला लागलो. मात्र, दुपारनंतर अचानक जुलाब आणि उलट्यांचा त्रास व्हायला लागला. त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता प्रकृती स्थिर आहे. मात्र, बाधा कशामुळे झाली, हे नेमके समजलेले नाही.वडिलांच्या जागी बी विभागात क्लार्क म्हणून कार्यरत असणारी तृप्ती शिर्केवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. शिर्के कुटुंबीयातील सदस्य माधुरी कांबळी यांनी सांगितले की, तृप्तीने गुरुवारी कँटीनमध्ये उत्तपा खाल्ला होता. मात्र, त्यानंतर साधारण दोन तास काम केले, नंतर अचानक चक्कर येऊन पडली. त्यामुळे त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.खाद्यपदार्थाचा अहवाल प्रलंबितएफडीएच्या अन्नसुरक्षा अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी कँटीनमध्ये तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने पालिकेच्या दादर येथील प्रयोगशाळेत विश्लेषणाकरिता पाठविण्यात आले आहेत, हा अहवाल प्रलंबित आहे. एफडीएने या रुग्णांकडून घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती घेतली आहे. शिवाय, शुक्रवारी सकाळी कँटीनमधील धान्याचे नमुनेही तपासणीसाठी घेतले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.रद्द केलेली ऑर्डर कँटिनच्या स्वयंपाक्याला पडली महागातगेल्या १० वर्षांहून अधिक काळ पालिकेच्या बी विभागातील कार्यालयातील कँटीनमध्ये स्वयंपाक्याला म्हणून काम करणाºया ६१ वर्षीय कांचन नरसिंह यांना रद्द केलेल्या आॅर्डरमधील डोसा खाल्ल्याने त्रास झाला आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांना जुलाब, उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. याविषयी कांचन नरसिंह यांनी सांगितले की, आठवड्यात दोन वेळा कँटीनमध्ये खाद्यपदार्थ बनविण्याची सामग्री भरण्यात येते. त्याप्रमाणे, गुरुवारी ३०-३५ लोकांना पुरेल एवढे डोशाचे पीठ करण्यात आले होते. त्यातून उत्तपा आणि डोसा बनवून कार्यालयातील कर्मचाºयांना देण्यात आला. मात्र, एक आॅर्डर रद्द झाल्याने पुन्हा कँटीनमध्ये आणण्यात आली. रद्द झालेली आॅर्डर असल्याने त्यातील डोसा खाल्ला होता. अखेरीस त्याचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.पदार्थाची चव कडू होतीकार्यालयात गेले सहा महिने कार्यरत आहे. कॉफ्रर्ड मार्केट परिसरात राहते. मात्र, या कँटीनमध्ये बºयाचदा नाश्ता करते. त्या दिवशी खाल्लेल्या डोशाची चव अत्यंत कडू होती. खाल्ल्यानंतर काही वेळाने उलट्या, मळमळण्याचा त्रास झाला. कार्यालयातील सहकाºयांनी त्वरित रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर, आता उपचारानंतर प्रकृती स्थिर आहे. - प्रतीक्षा मोहिते
विषबाधा प्रकरण; दहा रुग्णांना उपचार करून डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 12:57 AM