Join us

रेल्वेरुळांलगत गटाराच्या पाण्यावर येणाऱ्या भाज्या विषारी! प्रशासन काही बोलणार की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 11:33 AM

कारवाईबाबत रेल्वे प्रशासन ढिम्म, सांडपाण्यावर डोलताहेत मळे, मुंबईकरांच्या जीवाशी सुरू आहे खेळ.

मुंबई : रोज सकाळी ऑफिस वेळेत गाठण्यासाठी मुंबईकर लोकलच्या गर्दीत स्वतःला झोकून देतात. एकापाठोपाठ स्टेशन मागे टाकत लोकल पुढे सरकते. या प्रवासात रेल्वेरुळालगत हिरवाईने नटलेले भाज्यांचे छोटेछोटे गळे दिसतात. त्यात असतो पालक, लाल माठ, मेधी आणि तत्सम भाजीपाला काँक्रीटच्या जंगलात ही हिरवळ डोळ्यांना सुखावणारी असली तरी याच भाज्या मुंबईकरांच्या ताटात पडतात तेव्हा त्या आरोग्याला घातक ठरतात, असा आक्षेप अनेक वर्षे घेतला जात आहे. मात्र यावर कोणालाही गंभीरपणे संशोधन करावे असे वाटत नाही, असे संशोधन चालू असेल तर त्याचे निष्कर्ष रेल्वे प्रशासनाला सांगावे वाटत नाही. रेल्वेरुळांच्या बाजुला तरारलेले विषारी सांडपाण्यावर पोसलेले हे भाज्यांचे मळे रोज मुंबईकरांच्या ताटात भाजी बनून जात आहेत.

विषारी गोष्टी पोटात जाण्याची शक्यता :

दादर रेल्वे रुळाच्या दुतर्फा असणाया भागात ज्या भाज्या पिकविल्या जातात, त्याला बन्याचदा रसायनमिश्रित पाणी दिले जाते, त्या भाज्या खाल्ल्यानंतर कॅन्सर होतो किवा नाही याबाबत अद्याप वैद्यकीय शास्त्रात काही नमूद केलेले नाही. मात्र त्या पाण्यावरील भाज्यामुळे लेड किवा अन्य विषारी गोष्ठी पोटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही - डॉ. सचिन आलमेल, कर्करोग कझ, पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल

पचन संस्था, मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो :

रेल्वे रुळालगतच्या जमिनीवर भाजीपाला पिकवण्यासाठी घरगुती आणि उद्योगधद्यामधील सांडपाण्याचा वापर केला जातो. सांडपाणी खूपच प्रदूषित असेल तर असा साहपाण्यावर भाजी उगवत नाही. मात्र अनेक वेळा जेव्हा साइपाण्याचा फ्लो कमी किंवा ज्या सांडपाण्यात प्रदूषण कमी निदर्शनास येईल, असे सांडपाणी भाजी पिकवण्यासाठी वापरले जाते. ती भाजी आपल्या जेवणात आली तर आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होतो. रक्त्तावर परिणाम होऊ शकतो. मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो.

वर्षभरात एकही कारवाई नाही :

कल्याण-डोंचिवली परिसरात कमी टर्जाची भाजी साधारणपणे रात्रीच्या वेळी रोल्वे स्थानकाच्या बाहेर स्कायवाक, पादचारी पूल, स्टेशनधा परिसर आदी भागात विकली जाते. चांगल्या पाण्यात पिकविलेल्या भाजीच्या तुलनेत ही स्वस्त भाजी नागरिकांना वाटेवर सहज मिळते. अनेकदा हिरवा रंग यावा यासाठी हिरमा एलईडी लागून त्याचा उजेड भात्तीवर पडला की ती फ्रेश वाटते. त्यामुळे भाजी घेतली जाते.

रेल्वेमार्गालगतचे भाज्यांचे मर्क आणि त्यांची विषाक्तता या विषयावर माध्यमांनी सातत्याने आवाज उठवला, प्रवासांनी आंदोलने केली तरी धातूरमातूर कारवाईपलीकडे मध्य रेल्वे प्रशासनाने कारवाई केली नाही. गेल्या वर्षभरात तर यासंदर्भात एकही कारवाई झाल्याची नोंद नाही. त्यामुळेच विषारी पाण्यावर पोसले गेलेले हे भाज्यांचे मळे सुखेनैव डोलत आहेत.

का केली जाते लागवड?

मुंबई व उपनगरात रेल्वे मार्गालगतची जागा रेल्वेच्या मालकीची आहे, रेल्वे कर्मचायांना माफक शुल्क आकारून ही जमीन भाडेपट्टीने देण्यात येते. भाज्या पिकविण्यासाठी चांगल्या पाण्याचा वापर करावा, ही अट असते. परंतु ती पाळली जात नाही. रेल्वे प्रशासन त्याकडे सोईस्करपणे डोळेझाक करते.

कल्याणजवळही घाण पाण्यावर पिकतो भाजीपाला :

• रेल्वेसळालगत विषारी सांडपाण्याच्या जोरावर भाजीपाला पिकविण्याचेप्रकार वाकुली, कल्याण येथेही सर्रास चालत आहेत. मुला, पालक, मेथी कांटेपात अशा भाज्यांचा त्यात समावेश असतो. यांगीही पिकवली जातात, पण ती हॉटेलात पाठविली जातात.

• ठाकुर्ली, कल्याणला जाताना पत्रिपुननजीक, कलव्याला जाताना बोगदा सोडला की त्या बाहेरील जागेत भाजी पिकवली जाते. पावसाच्या दिवसात पावसाचे पाणी मिळते, मात्र मिळेल त्या पाण्याने ही भाजी पिकवली जाते.

• खाडीच्या पाण्याचा वापर केला जातो. काही वर्षांपूर्वी या अशा भाज्या पिकवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती. 

• रेल्वे मार्गालगतच्या झोपडपट्टीतील रासायनिक कारखान्यानी सोडलेले सांडपाणी, अन्य ऊत्पादनाकरिता वापरून मोकळ्या जागेत सोडलेले पाणीयाचा वापर करुन भाज्या पिकविल्या जातात.

• अत्ती पालेभाजी लवकर पिकते, आणि ती लगेच काढून तिची जुडी बनवून नजीकच्या पाण्यात बुडवून स्वच्चा करायची आणि ती बोचकी बाजारात विक्रीसाठी पाउदली जाते.

टॅग्स :मुंबईरेल्वेभाज्या