धुराच्या लोटांनी अडवली पुन्हा मेट्रोची वाट

By admin | Published: October 12, 2014 01:27 AM2014-10-12T01:27:19+5:302014-10-12T01:27:19+5:30

पालिकेकडून करण्यात येत असलेल्या धूरफवारणीमुळे मेट्रो स्थानकातील फायर अलार्म वाजले आणि गोंधळ उडाल्याची घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती.

Pole locks blocked again | धुराच्या लोटांनी अडवली पुन्हा मेट्रोची वाट

धुराच्या लोटांनी अडवली पुन्हा मेट्रोची वाट

Next
>मुंबई : पालिकेकडून करण्यात येत असलेल्या धूरफवारणीमुळे मेट्रो स्थानकातील फायर अलार्म वाजले आणि गोंधळ उडाल्याची घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. यानंतर पुन्हा एकदा धुरामुळेच मेट्रोत शनिवारी घबराट पसरली. मेट्रोच्या पुलाखालून धुराचा लोट येत असल्याने काहीतरी बिघाड असल्याची शक्यता एका मेट्रो पायलटला वाटली आणि त्यामुळे मेट्रो त्वरित थांबवली. मात्र पुलाखालीच असलेल्या कच:याला आग लागल्याचे समजताच पुन्हा मेट्रो पूर्ववत सुरू केली. या घटनेमुळे मेट्रो उशिराने धावत होती. 
असल्फा स्थानकाजवळच मेट्रो येताच धुराचा लोट मेट्रो पायलटला दिसला आणि पायलटने मेट्रो थांवबली. त्याने याची माहिती कंट्रोल रूमला दिली. मात्र पायलटने स्वत: आपल्या केबिनमधून उतरून धूर येत असलेल्या जागी जाऊन पाहिले असता सगळा प्रकार समोर आला.(प्रतिनिधी)
 
जून महिना :
ओव्हरहेड वायरमध्ये पक्षी अडकल्याने मेट्रो दीड तास रखडली होती. 
 
जुलै महिना : मेट्रो मरोळ स्थानकात आली असता तिचे दरवाजे उघडलेच नाहीत, त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. पुढील स्थानकावर मेट्रो पोहोचल्यानंतर मात्र तिचे दरवाजे उघडले होते.

Web Title: Pole locks blocked again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.