ठाणे : हाणामारीच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर विष्टा भिरकावून पोलीस ठाण्यातील खुर्च्यांची तोडफोड करीत धुमाकूळ घालणाऱ्या विजय सोनावणे (२४, रा. अंबिकानगर, ठाणे) याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.एका हाणामारीच्या गुन्ह्यात वागळे इस्टेट पोलिसांनी विजयला १३ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले होते. याचाच राग मनात धरून त्याने पोलीस ठाण्याच्या अंमलदार कक्षात तसेच बाहेरील स्वागत कक्षात पहाटे २.३० वा.च्या सुमारास प्रचंड गोंधळ घातला. पोलिसांनी आपल्यावर कोणतीही कारवाई करू नये, यासाठी त्याने भलतीच शक्कल लढवली. पोलीस नाईक सुधीर मोरे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर त्याने विष्टा तसेच त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला झालेल्या जखमेतील रक्त फेकून त्यांना धक्काबुक्की केली. (प्रतिनिधी)
पोलीस ठाण्यातच आरोपीचा धुमाकूळ!
By admin | Published: November 15, 2016 6:04 AM