पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाला जीवदान
By admin | Published: August 20, 2014 01:31 AM2014-08-20T01:31:04+5:302014-08-20T01:31:04+5:30
चाकूने वार करत तरुणाला लुटण्याचा प्रय} करणा:या आरोपीला आरसीएफ पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. पोलिसांनी वेळीच या तरुणाला आरोपीच्या तावडीतून सोडवल्याने त्याचे प्राण वाचले
Next
चेंबूर : चाकूने वार करत तरुणाला लुटण्याचा प्रय} करणा:या आरोपीला आरसीएफ पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. पोलिसांनी वेळीच या तरुणाला आरोपीच्या तावडीतून सोडवल्याने त्याचे प्राण वाचले असून सध्या त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून शहरात सोनसाखळी चोरी आणि लूटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी रस्त्यावर गस्त अधिक वाढवली आहे. सोमवारी शहरात दहीहंडी उत्सव असल्याने हा उत्सव संपल्यानंतर चेंबूरच्या वाशी नाका येथे राहणारा लतिफ करजागी (22) हा तरुण रात्री 1 वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी जात होता. याच वेळी त्याला सिद्धेश कांबळे (19) हा आरोपी भेटला. फोन करण्याच्या बहाण्याने या आरोपीने लतिफकडून त्याचा फोन मागितला. मात्र फोन हातात मिळताच या आरोपीने तिथून पळ काढण्याचा प्रय} केला. मात्र लतिफने त्याला रोखताच आरोपीने त्याच्या जवळ असलेला चाकू काढून लतिफवर दोन वार केले. लतिफला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरसीएफ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पकडण्यात आलेला हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर घाटकोपर पोलीस ठाण्यात मारामारी, लूट आणि चोरीचे 5 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून तरुणाचा चोरलेला मोबाइल हस्तगत केला आहे. तसेच शहरात त्याच्यावर आणखी गुन्हे दाखल असण्याची शक्यतादेखील पोलिसांनी वर्तवली आहे. (प्रतिनिधी)
च्घटनेच्या वेळी आरसीएफ पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई लालासाहेब बारसिंह आणि बोराडे हे या परिसरात गस्त घालत होते. लतिफच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच त्यांनी मोटारसायकल थांबवली. याच वेळी आरोपीने पोलिसांना पाहताच वाशी नाक्याच्या दिशेने पळ काढला.
च्लहान गल्लीमधून हा आरोपी पळत असल्याने बारसिंह यांनी त्यांची मोटारसायकल तिथेच टाकून त्याचा पाठलाग सुरू केला. तर जाधव यांनी जखमी तरुणाकडे धाव घेतली. याच दरम्यान आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप राऊत आणि पोलीस निरीक्षक एस. जाधव हे बंदोबस्त संपवून पोलीस ठाण्याकडे जात होते.
च्त्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी देखील गाडीतून उतरून या आरोपीचा पाठलाग सुरू केला. काही अंतर पुढे जाताच पोलिसांनी या आरोपीला झडप घालून ताब्यात घेतले.