मुंबईत पोलिसांचे ‘ऑल आउट ऑपरेशन’; दीड हजार चालकांसह ११२ आरोपींवर कारवाई,  ५,८३६ वाहनांची झडती 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 10:28 AM2024-05-20T10:28:59+5:302024-05-20T10:29:57+5:30

या विशेष मोहिमेदरम्यान ५ हजार ८३६ वाहनांची झाडाझडती घेत दीड हजार चालकांवर कारवाई केली. तसेच,  २०५ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवून ११२ आरोपींवर कारवाई करण्यात आली. 

Police 'all out operation' in Mumbai; Action against 112 accused including 1500 drivers, 5,836 vehicles searched | मुंबईत पोलिसांचे ‘ऑल आउट ऑपरेशन’; दीड हजार चालकांसह ११२ आरोपींवर कारवाई,  ५,८३६ वाहनांची झडती 

मुंबईत पोलिसांचे ‘ऑल आउट ऑपरेशन’; दीड हजार चालकांसह ११२ आरोपींवर कारवाई,  ५,८३६ वाहनांची झडती 

मुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी ऑल आउट ऑपरेशन राबविले. या अंतर्गत शहरातील १ हजार ६०५ ठिकाणी नाकाबंदी केली. या विशेष मोहिमेदरम्यान ५ हजार ८३६ वाहनांची झाडाझडती घेत दीड हजार चालकांवर कारवाई केली. तसेच,  २०५ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवून ११२ आरोपींवर कारवाई करण्यात आली. 

शनिवारी रात्री १० वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत राबविलेल्या ऑपरेशन ऑल आउट दरम्यान पोलिसांनी शहरातील ५३९ संवेदनशील ठिकाणांची  तपासणी केली. त्यासोबतच पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून पोलिस अभिलेखावरील १ हजार ९५ गुन्हेगारांची तपासणी करून ११२ आरोपींची धरपकड करून प्रतिबंधात्मक कारवाई केली. तसेच, संशयितरीत्या फिरणाऱ्या ८२ जणांवर कारवाई करण्यात आली. 

हॉटेल्स, लॉज यांचीही तपासणी
मुंबई शहरात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या हेतूने पोलिसांनी शहरातील हाॅटेल्स, लाॅज, मुसाफिरखाने अशा ७३८ आस्थापनांची झाडाझडती घेतली. अवैधरीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी ३१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 
 

Web Title: Police 'all out operation' in Mumbai; Action against 112 accused including 1500 drivers, 5,836 vehicles searched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.