CSMT स्थानकात बॉम्बची अफवा; बॉम्ब स्कॉड, पोलिसांची कसून तपासणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 07:51 AM2021-08-07T07:51:23+5:302021-08-07T07:52:32+5:30

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे CSMT स्थानकावर बॉम्ब ठेवण्यात आला असून, घातपाताचा निनावी फोन आल्यानंतर रेल्वे आणि स्थानिक पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली.

police and bomb squad investigated mumbai csmt railway station after bomb threat call | CSMT स्थानकात बॉम्बची अफवा; बॉम्ब स्कॉड, पोलिसांची कसून तपासणी 

CSMT स्थानकात बॉम्बची अफवा; बॉम्ब स्कॉड, पोलिसांची कसून तपासणी 

Next

मुंबई:मुंबईछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे CSMT स्थानकावर बॉम्ब ठेवण्यात आला असून, घातपाताचा निनावी फोन आल्यानंतर रेल्वे आणि स्थानिक पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. यानंतर तातडीने घटनास्थळी पोलीस, बॉम्ब स्कॉड आणि श्वान पथक दाखल झाले. CSMT परिसराची कसून तपासणी केल्यानंतर संशयास्पद वस्तू किंवा तसे काही आढळून आले नसल्याची माहिती मिळाली आहे. (police and bomb squad investigated mumbai csmt railway station after bomb threat call)

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, शुक्रवार, ६ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी मुंबई नियंत्रण कक्षाकडून CSMT स्थानकात घातपात करण्यात येणार आहे, असा फोन आल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेचच सीएसएमटी स्थानकात शोधमोहीम राबवण्यात आली. यामध्ये बॉम्ब स्कॉड, श्वान पथकही सहभागी झाले होते. 

या शोधमोहिमेदरम्यान, CSMT स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १ ते ८, DRM कार्यालय आणि परिसर, सेंट जॉर्ज गल्ली परिसर, धन्यवाद गेट परिसर, १८ नं पार्किंग, प्लॅटफॉर्म पार्किंग परिसराची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, उपरोक्त कॉल प्रमाणे कोणतीही संशयी वस्तू अगर प्रकार मिळून आला नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

दरम्यान, या निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीने CSMT सह दादर, भायखळा आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा बंगला अशा चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगितले. यामुळे पोलिसांसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर माहितीचे गांभीर्य लक्षात घेत ज्या नंबरवरून हा कॉल आला होता, त्या नंबरवर पोलिसांनी लगेचच संपर्क साधला तेव्हा त्याने फोन स्विच ऑफ करून ठेवल्याचे लक्षात आले. यानंतर पोलिसांनी कसून तपास केला असून, पुढील चौकशी सुरू असल्याचे समजते. 
 

Web Title: police and bomb squad investigated mumbai csmt railway station after bomb threat call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.