Join us

वाहतूक कोंडीने पोलीसही बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:10 AM

मुंबई : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कोंडी होत असताना हे खड्डे बुजवण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणा पुढाकार घेत ...

मुंबई : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कोंडी होत असताना हे खड्डे बुजवण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणा पुढाकार घेत नाही. त्याचा वाहतुकीवर परिणाम होऊन वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीने पोलीसही हैराण झाले आहेत.

करोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज असल्याने सरकारने श्रमिक, कष्टकरी आणि नोकरदार वर्गाला गर्दी टाळण्याचे आदेश दिले आहे. कामावर जाण्यासाठी या वर्गाला लोकल प्रवासाला बंदी आहे. परिणामी बसमधील तुडुंब गर्दीत तसेच रिक्षा-टॅक्सी, खासगी बसमधून हा वर्ग प्रवास करत आहे. रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढली आहे.

वाहतूक विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले पावसाळ्यात शहरांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते तसेच अपघातही होतात. तसेच वाहनचालकांचे वाद होतात. वाहतूक पोलिसांना वाहतूक नियमन सोबत नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी. मात्र या वाहतूक कोंडीमुळे त्यांना पुरेसा वेळ देता येत नाही.

खड्डे अपघातात झालेले मृत्यू

२०१६ ते २०१९ या काळात मुंबईत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एकूण दहा हजार ७६ प्रवाशांचा मृत्यू झाला. २०१८च्या तुलनेत २०१९ मध्ये वाढ झाली असून, दोन हजार १४० प्रवाशांना खड्ड्यांमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. २०१८ मध्ये दोन हजार १५ नागरिकांचा मृत्यू झाला होता. २०२०चा अहवाल अद्याप तयार झालेला नसून त्यासाठी मंत्रालयाकडून माहिती एकत्र करण्याचे काम सुरू आहे.