वृद्ध आजी-आजोबांसाठी पोलीस ठरताहेत आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:06 AM2021-07-28T04:06:13+5:302021-07-28T04:06:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : घरात एकट्या असलेल्या वृद्धांना सध्या मुंबई पोलिसांचाच आधार असल्याचे चित्र पाहावयास मिळते. घरातल्या रेशनिंगपासून ...

The police are the basis for elderly grandparents | वृद्ध आजी-आजोबांसाठी पोलीस ठरताहेत आधार

वृद्ध आजी-आजोबांसाठी पोलीस ठरताहेत आधार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : घरात एकट्या असलेल्या वृद्धांना सध्या मुंबई पोलिसांचाच आधार असल्याचे चित्र पाहावयास मिळते. घरातल्या रेशनिंगपासून गॅस, लाईट बिल, औषध आणण्यासाठी पोलीस त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. अशात त्यांच्यातील नाळ अधिक घट्ट होताना दिसत आहे.

मुंबईत एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक तसेच वृद्ध आजी आजोबांची माहिती पोलीस दफ्तरी नोंद आहे. अशात प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत त्यांच्या भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीगाठी तसेच त्यांच्या प्रत्येक कॉलला मुंबई पोलीस धावून जाताना दिसत आहेत.

विलेपार्ले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांनी नवीन वर्षानिमित्त कॉर्नर मिटिंग सुरु केल्या आहेत. त्यांच्या बैठकीला विलेपार्लेकरांचाही भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या बैठकी अंतर्गत ते ज्येष्ठ नागरिकांची होणारी फसवणूक आणि महिला संबंधित अत्याचारावर विशेष जनजागृती करत आहेत. यात गुन्हा कसा घडतो? त्यावर कशा पद्धतीने नियंत्रण आणता येईल याबाबत ते मार्गदर्शन करत आहेत.

अशातच विलेपार्ले परिसरात एकटे राहणाऱ्या ८३ वर्षीय लेले आजोबांसाठी पोलीस ठाणे जणू दुसरे घरच बनले आहे. काणे सांगतात, २००५ मध्ये लेले आजोबांसोबत ओळख झाली. घरात एकटे असल्याने पोलिसांसोबत गप्पा मारणे हा त्यांचा दिनक्रमच. अशात कधी त्यांची बोलण्याची इच्छा झाली की मी घरी जातो किंवा त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन येण्यासाठी गाडी पाठवतो. तास, दोन तास त्यांच्या गप्पांमध्ये जातात आणि ते आता माझ्या वडिलांसारखेच झाल्याचे त्यांनी सांगितले.

वाढदिवसही होतो साजरा...

अशात अनेकदा ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवसही पोलीस ठाण्यात किंवा घरी जाऊन साजरा करण्यात येतो.

जवळचे लांब झाले

कोरोनाच्या काळात त्याच भागात राहणाऱ्या वृद्ध नागरिकाला घरात जेवण बनविणे शक्य नसल्याचा कॉल धडकताच, पोलिसांकड़ून त्यांच्यासाठी जेवणाचा डबा पोहोचविण्यात आला. अशात जवळचे लांब झाले तेव्हा पोलीसच त्यांच्या जवळ होते.

Web Title: The police are the basis for elderly grandparents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.