Join us  

निर्विघ्न मतदानासाठी पोलीस सज्ज

By admin | Published: October 14, 2014 12:15 AM

विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे.

नवी मुंबई : विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. मतदारांनी निर्भयपणो मतदान करावे यासाठी गेल्या महिनाभरात अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याकरिता राज्य राखीव दलाच्या तुकडय़ाही शहरात दाखल झाल्या आहेत. 
विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडत आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्रत ऐरोली, बेलापूर, पनवेल व उरण हे चार मतदार संघ आहेत. त्यानुसार या ठिकाणी निर्भयपणो मतदान होण्याकरिता पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. चारही मतदार संघामध्ये एकूण 353 इमारतींमध्ये 1414 बुथमध्ये मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून गेल्या महिनाभराच्या कालावधीत गुन्हेगारांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस आयुक्तालय क्षेत्रतील 15क्क् जणांना वॉरंट, समन्स व नोटिसा बजावून अटक करुन न्यायालयापुढे हजर केले आहे. तर 9क्1 जणांवर विविध कायद्याअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे. एका सराईत गुंडाला एमपीडीए लागू करुन एकावर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त फत्तेसिंह पाटील यांनी सांगितले. अनेक गुन्हय़ांमध्ये फरार असलेल्या चौघांना अटक करुन विविध गुन्हय़ांमध्ये पोलिसांना पाहिजे असलेल्या 65 जणांना देखील अटक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्याशिवाय पोलीस ठाणो आणि गुन्हे शाखेकडून झालेल्या कारवायांमध्ये 2क् बेकायदा शस्त्रे व 23 काडतुसे जप्त केली आहेत. तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या 15 जणांवर तडीपारीची कारवाई केलेली आहे. पोलिसांनी दारुबंदीच्या कारवायांमध्ये 33 जणांना अटक करुन 2 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 
नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी एकूण 45 लाख 41 हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे. त्यापैकी दोन घटनांचा राजकीय संबंध उघड झाला असून त्यासंबंधीचे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. मतदानाच्या दिवशी शहराबाहेरुन पैसा अथवा गुन्हेगार आणले जावू शकतात. यावर र्निबध लावण्याकरिता 15 ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आल्याचे अपर पोलीस आयुक्त फत्तेसिंह पाटील यांनी सांगितले. त्याशिवाय 8क् नवे मोबाइल पेट्रोलिंग वाहने सक्रिय करण्यात आली आहेत. मतदानाच्या दिवशी 45क्क् पोलीस कर्मचारी, 5क्क् अधिकारी कार्यरत राहणार आहेत. त्यांच्या मदतीला केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दलाच्या 5  तुकडय़ांचे सुमारे 6क्क् जवान शहरात दाखल झाले आहेत. त्याद्वारे शहरात शांतता राखण्याचा प्रय} पोलिसांचा असून नागरिकांनी निर्भयपणो मतदान करावे, असे आवाहनही अपर पोलीस आयुक्त पाटील यांनी केले आहे.
पोलीस आयुक्तालयात एकूण 43 संवेदनशील केंद्रे असून त्या ठिकाणांवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. त्यापैकी 9 केंद्रे परिमंडळ 1 मधील असून 25 केंद्रे ही परिमंडळ 2 मधील आहेत. मतदानाच्या दिवशी पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्त, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त मतदान केंद्रांना भेटी देणार आहेत. या दरम्यान त्यांच्यासोबत मोठय़ा प्रमाणात सुरक्षा बलाचा फौजफाटा असणार आहे. त्यामुळे केंद्रांवरील गैरप्रकारांना आळा बसेल असा विश्वास पोलिसांना आहे.  या पत्रकार परिषदेस गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे, विशेष शाखा उपआयुक्त विश्वास पांढरे हे उपस्थित होते. (प्रतिनिधी)