Join us

दहा लाखांचा गंडा घालणाऱ्या बडतर्फ पोलिसासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 6:16 AM

एका नागरिकाची दहा लाखांची फसवणूक करणा-या एका बडतर्फ पोलिसासह दोघा जणांना गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

मुंबई : म्हाडाचे घर स्वस्तात मिळवून देण्याच्या बहाण्याने एका नागरिकाची दहा लाखांची फसवणूक करणा-याएका बडतर्फ पोलिसासह दोघा जणांना गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. प्रकाश आत्माराम पाडावे (रा. पालघर) व शशिकांत लिम्बारे अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून फसवणुकीचे आणखी गुन्हे उघडकीसयेण्याची शक्यता आहे. पाडावे याला २१ वर्षांपूर्वी मुंबई पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. तो म्हाडाच्या एका अधिकाºयाकडे बॉडीगार्ड असल्याचे भासवून दलाल लिम्बारे याच्या मदतीने फसवणूक केल्याचे उपायक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. पाडावे व लिम्बारे यांनी प्रभादेवी येथे म्हाडाच्या दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ (आरआर बोर्ड) येथून स्वस्तात μलॅट मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी खोटी कागदपत्रे बनविली. त्यानंतर फिर्यादीने त्याच्यावडिलांच्या बॅँक खात्यातून आरटीजीएस करून पाडावेच्या खात्यावर १० लाख रुपये भरले. त्यानंतर दोघांनी आरआर बोर्ड व उपजिल्हाधिकाºयाच्या नावे खोटी कागदपत्रे बनवून दिली. μलॅटचा ताबा घेण्यासाठी गेले असता त्यांनाफसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याबाबत गेल्या महिन्यात १२ फेबु्रवारीला भोईवाडा पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा अन्वेषण शाखेचे कक्ष-२चे पथक समांतर तपास करीत होते. प्रभारी अधिकारी निनाद सावंत व त्यांच्यासहकाऱ्यांनी दोघांना मंगळवारी अटक केली. प्रकाश पाडावे हा १९९६ साली मुंबई पोलीस दलात भरती झाला होता. मात्र झटपट पैसे मिळविण्यासाठी तो गैरमार्ग अवलंबित होता. १९९९मध्ये त्याने नायगाव शस्त्रागारातून पोलिसांची शस्त्रे चोरून परस्पर विक्री केली होती.