लोकलवर दगडफेक करणाऱ्या माथेफिरुला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 07:36 AM2019-07-29T07:36:32+5:302019-07-29T07:36:56+5:30

लोकलवर दगडफेक करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हार्बर लाईनच्या सीएसएमटी - पनवेल मार्गावर मानखुर्द-वाशी स्थानकादरम्यान लोकलवर अज्ञाताने ही दगडफेक केली होती.

police arrested man who stone pelting on local Railway | लोकलवर दगडफेक करणाऱ्या माथेफिरुला अटक

लोकलवर दगडफेक करणाऱ्या माथेफिरुला अटक

Next

मुंबई : हार्बर मार्गावरील वाशी-मानखुर्द दरम्यान दगडफेक करणाऱ्याला वाशी रेल्वे पोलिसांना अटक केली आहे.   26 जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास बेलापूर स्थानकातून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलवरदगडफेक करण्यात आली. यावेळी वाशी - मानखुर्द दरम्यान लोकलमधील गार्ड आर. के. यादव यांच्या डोक्यावर दगड आदळल्यामुळे ते जखमी झाले होते.

आरोपी कन्नन हरिजन (20)  मानखुर्द परिसरातील मुंशी शाळेच्या परिसरातून पकडण्यात आले.  सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिसांनी दिली. ठाणे, कापूरबावडी पोलिस ठाण्यात आरोपी चोरीच्या गुन्ह्यात दहा महिने शिक्षा भोगली आहे, अशी माहिती  वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर सस्ते यांनी दिली.

लोकलवर दगडफेक करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हार्बर लाईनच्या सीएसएमटी - पनवेल मार्गावर मानखुर्द-वाशी स्थानकादरम्यान लोकलवर अज्ञाताने ही दगडफेक केली होती. यात दगडफेकीमुळे गार्ड जखमी झाला होता. जखमी गार्डला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. अलीकडेच दोन ते तीन अशा प्रकारच्या घटना लोकलमध्ये घडल्या असून रेल्वे प्रशासन याकडे गंभीरतेने पाहणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे. 

पनवेलहून सीएसएमटीकडे निघालेलेली हार्बर मार्गावरील लोकल वाशीहून निघाल्यानंतर मानखुर्द स्थानकाजवळ येताच लोकलवर दगडफेक करण्यात आली. दगड फेकण्यात आले तेव्हा लोकल वेगात असल्याने लोकलवर फेकलेले दगड शेवटच्या डब्यावर धडकले. यातील काही दगड मोटरमॅनच्या केबिनमध्येही गेले. केबिनमध्ये असलेला लोकलगार्ड या दगडफेकीत जखमी झाला. लोकलगार्डच्या डोक्याला यातील दगड लागल्याने गार्ड रक्तबंबाळ झाला होता. 

Web Title: police arrested man who stone pelting on local Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.