तोतया पोलिसाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 03:06 AM2017-08-01T03:06:33+5:302017-08-01T03:06:35+5:30
दिव्यांग डब्ब्यातून प्रवास करणाºया तोतया पोलिसाला अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली. रविंद्र पाटील (२१) असे त्याचे नाव असून तो विरार येथे राहणारा आहे.
मुंबई : दिव्यांग डब्ब्यातून प्रवास करणाºया तोतया पोलिसाला अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली. रविंद्र पाटील (२१) असे त्याचे नाव असून तो विरार येथे राहणारा आहे.
चर्चगेटला जाणाºया लोकलमधून दिव्यांग डब्ब्यातून प्रवास करताना मी पोलीस उपनिरीक्षक असल्याचा बनाव रविंद्र करत होता. हा बनाव सत्य ठरावा यासाठी तो खाकी पॅन्ट आणि पोलिस अधिकाºयांसारखे तपकिरी रंगाचे बूट घालत होता. अंधेरी स्थानकावर हवालदार कदम यांनी दिव्यांग डब्ब्यातून प्रवास करणाºया रविंद्रला हटकले. त्यावेळी मी कोपर पोलिस स्थानकात पोलीस उपनिरीक्षक असल्याची थाप रविंद्रने मारली. तपासणीअंती त्याच्याकडे कोणतेही ओळखपत्र नसल्याचे दिसून आले. केवळ मोबाईलमध्ये त्याचा पोलिस गणवेशातील फोटोतून आपण पोलिस असल्याचे तो भासवत होता. अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात रविंद्रवर कलम १७०, १७१, ४१९ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.