मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलनासाठी जाणाऱ्या मराठा बांधवांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 01:57 PM2022-03-25T13:57:11+5:302022-03-25T14:00:01+5:30
आरक्षणाबाबत सरकारचा फसवेगिरीमुळे निवेदनात गाजराचे फोटो देण्यात येणार होते.
मुंबई- मराठा आरक्षण मिळत नाही. यासाठी मराठा आंदोलक निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर आंदोलनासाठी रवाना झाले होते.
आरक्षणाबाबत सरकारचा फसवेगिरीमुळे निवेदनात गाजराचे फोटो देण्यात येणार होते. आरक्षणबाबत सरकार गाजर दाखवत आहे, अस या निवेदनातून दाखवण्याचा प्रयत्न होता. मात्र मराठा आरक्षण मिळाव यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर आंदोलनासाठी जाणारे मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. pic.twitter.com/bkpTTa8LId
— Lokmat (@lokmat) March 25, 2022