- मनीषा म्हात्रेमुंबई - मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या खाकीतील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मुंबई पोलिसांकडून आता ‘म्युझिकल प्रोजेक्ट फॉर मुंबई पोलीस’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत निवड झालेल्या खाकीतील कलाकारांना यूट्यूब प्लॅटफॉर्म तसेच, रिॲलिटी शोमध्ये संधी देण्याकरीता रेकॉर्ड केलेले व्हिडिओ शेअर करण्यात येणार आहेत.मुंबई पोलीस दलात विशेषतः कोरोनाच्या काळात खाकीतील कलाकार मोठ्या प्रमाणात समोर आले. अशात, स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी ही मंडळी स्वतः संगीत, वादन तसेच वेगवेगळे छंद जोपासत आहेत. यातील अनेक जण आपले व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करीत आहेत. मुंबई पोलीस दलातील सर्व इच्छुक असलेले पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली माहिती परिमंडळ कार्यालय, शाखा तसेच विभाग कार्यालयात पाठवावी. तेथून ही माहिती एकत्रित करत पुढे मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत मुंबई पोलीस आयुक्तांच्या ईमेल आयडीवर पाठविण्याच्या सूचना पोलीस उपायुक्त (अभियान) चैतन्या एस. यांनी दिल्या आहे. पोलिसांना प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना राबवित असल्याचेही यात नमूद केले आहे. असा आहे उपक्रमपोलीस दलातील या कलाकारांच्या कलेला वाव देत हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘म्युझिकल प्रोजेक्ट फॉर मुंबई पोलीस’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत गायन तसेच वादनाची आवड असलेल्यांची यादी मागविण्यात आली आहे. ही यादी मिळताच सर्वांचा एक ग्रुप तयार करण्यात येणार आहे. या ग्रुप मध्ये व्हिडिओ मागवून त्यातून निवड करण्यात येईल. योजनेअंतर्गत निवड झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना यूट्यूब तसेच रिॲलिटी शो यामध्ये संधी देण्याकरिता रेकॉर्ड केलेले व्हिडिओ शेअर करण्यात येणार आहे.
सध्या फक्त मागविली माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी सध्या तरी कुठलीही योजना राबवित नसून, फक्त संगीत तसेच विविध आवड असलेल्यांची यादी मागविण्यात आली असल्याचे नमूद केले.