ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 24 - कल्याण एसटी आगारात वाहतुकीला अडथळा ठरणारी पोलिसाची दुचाकी हटवल्याच्या किरकोळ कारणावरून पोलिसाने एसटी चालकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या निषेधार्थ एसटी कर्मचाऱ्यानी दोन तास चक्का जामआंदोलन केले. दुपारी तीन ते पाच या काळात मात्र प्रवास्यांना मोठा मनस्ताप सहन केला. अखेर कामगार संघटनाची एसटीच्या वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी समजूत काढून संबधित पोलिसावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. कल्याण एसटी आगारात असणाऱ्या पोलीस चौकीतील मुंडे नामक पोलिसाने फलाट क्रमांक १० वर अवैधपणे आपली दुचाकी उभी केली होती. आगारातून बस बाहेर काढतांना ही दुचाकी अडथळा ठरत असल्याने चालक बी. टी. आव्हाड यांनी ही दुचाकी अन्यत्र पार्क केली. मात्र यामुळे मुंडे पोलीस भडकला. त्यांनी माझ्या दुचाकीला का हात लावला म्हणत आव्हाड यांना मारहाण करण्यास सुरुकेली. कांही कारण नसतांना एसटी चालकाला मारहाण झाल्याचे समजताच सर्व चालक, वाहक, तंत्रज्ञ यांनी काम बंद सुरु केले. यामुळे दुपारी तीन ते पाच या काळात आगरातून एकही एसटी बाहेर जावू शकली नाही. यामुळे प्रवासी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अखेर कर्मचारी वर्गाची एसटीच्या वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी समजूत काढल्यानंतर एसटी सेवा सुरु झाली.