Join us

Police Commemoration Day : 21 ऑक्टोबरला का साजरा होतो पोलीस शहीद दिन?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 11:41 AM

... या कारणााठी 21 ऑक्टोबर या दिवशीच Police Commemoration Day साजरा केला जातो.

21 ‍ऑक्टोबर 1959 रोजी CRPFचे पोलीस सब-इन्स्पेक्टर किरणसिंग यांच्या नेतृत्वात अक्साईचीनच्या दुर्गम भागात 16,000 फुटांवर असलेल्या Hot Springs या ठिकाणी गस्त घालत असलेल्या आपल्या 10 जवानांवर चिनी सैनिकांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात आपल्या 10 जवानांना वीरमरण आले. आपले कर्तव्य बजावत असताना या जवानांनी अतिशय शौर्याने शत्रूंविरोधात लढा दिला. या जवानांच्या हौतात्म्याचे स्मरण म्हणून आजही दरवर्षी  21 ‍ऑक्टोबरला देशभरातून प्रत्येक प्रांताचे प्रतिनिधित्व करणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांना आदरांजली वाहिली जाते. 

(VIDEO:Police Commemoration Day : पोलीस स्मृतीदिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना)

Police Commemoration Day : पोलीस हुतात्मा दिन

शिवाय, देशाची अखंडता आणि एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी, कधी नक्षल्यांविरोधात तर कधी समाजविघातक कृत्य करणार्‍यांविरोधात कारवाई करताना तर कधी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन नीट व्हावे म्हणून सतत जागरूकपणे आपली सेवा बजावताना, कर्तव्यात जराही कसूर न करता वीरमरण प्राप्त झालेल्या पोलीस जवानांची आठवण मनात कायम तेवत ठेऊन श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरात हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणूनदेखील साजरा केला जातो. 

(पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास, वर्षात दुसऱ्यांदा लाल किल्ल्यावर केलं ध्वजारोहण)

यानिमित्त आज राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे व पोलीस वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वस्तूसंग्रहालयात पोलिसांचे गणवेश, त्यांची हत्यारे आणि अन्य साहित्य ठेवण्यात आले आहे.

 

टॅग्स :पोलीस हुतात्मा दिनपोलिसनरेंद्र मोदी