‘मुंबई २४ तास’मधील आस्थापनांबाबत पोलीस संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 06:45 AM2020-01-25T06:45:20+5:302020-01-25T06:45:39+5:30

नाइटलाइफमध्ये अनिवासी क्षेत्रांमधील किती आस्थापनांचा सहभाग असेल याबाबत पोलिसांकडे अधिकृत माहिती नसल्याने पहिल्या टप्प्यात मध्यरात्री होणाऱ्या गर्दीनुसार बंदोबस्तात वाढ करण्यात येणार असल्याची भूमिका मुंबई पोलीस घेताना दिसत आहेत.

Police confused about establishments in 'Mumbai 24 Hours' | ‘मुंबई २४ तास’मधील आस्थापनांबाबत पोलीस संभ्रमात

‘मुंबई २४ तास’मधील आस्थापनांबाबत पोलीस संभ्रमात

Next

मुंबई : नाइटलाइफमध्ये अनिवासी क्षेत्रांमधील किती आस्थापनांचा सहभाग असेल याबाबत पोलिसांकडे अधिकृत माहिती नसल्याने पहिल्या टप्प्यात मध्यरात्री होणाऱ्या गर्दीनुसार बंदोबस्तात वाढ करण्यात येणार असल्याची भूमिका मुंबई पोलीस घेताना दिसत आहेत. तसेच कुठेही कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याला योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा व्यवहारही २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी घेतला. २७ जानेवारीपासून मुंबईतील अनिवासी क्षेत्रांमधील मॉल्स, दुकान, रेस्टॉरंट २४ तास सुरू राहणार आहेत. पहिल्या दिवशी शहरातील २५ ठिकाणे सहभागी होतील, अशी माहिती पोलिसांकडे आहे. मात्र याबाबत पालिकेसह अन्य यंत्रणांकडून गुरुवारी संध्याकाळपर्यंत अधिकृत माहिती मिळालेली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे रात्रीच्या गस्तीवर भर असतोच. त्यानुसार, गस्त सुरू राहणार आहे. त्यात गरजेनुसार वाढ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यात ज्या ठिकाणी जास्त गर्दी होईल तेथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्हे घडू नयेत यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश प्रत्येक पोलीस ठाण्याला देण्यात आले आहेत. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी जास्त गर्दी होण्याच्या शक्यतेतून रात्रीच्या बंदोबस्तात वाढ करण्यात येणार असल्याचेही अशोक यांनी नमूद केले.
ज्या ठिकाणी महिलांचा समावेश असेल अशा ठिकाणी त्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेत खासगी सुरक्षा नेमण्याच्या सूचनादेखील यात सहभागी होणाºया आस्थापनांना देण्यात येत आहेत.

पोलिसांवरील ताण वाढण्याची  भीती

अपुरे मनुष्यबळ, त्यात दिवसा ८० टक्के पोलीस कार्यरत असतात. ‘मुंबई २४ तास’मुळे निर्माण होणाºया वाहतुकीच्या समस्या, मारामाऱ्यांसह अन्य गुन्हे, महिलांची सुरक्षितता यासाठी रात्रीही दिवसाप्रमाणेच ८० टक्के पोलीस नेमणे आवश्यक आहे. मात्र सद्य:परिस्थितीत तातडीने मनुष्यबळ नेमणे शक्य नसल्याने मुंबई पोलिसांवर ताण येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.

Web Title: Police confused about establishments in 'Mumbai 24 Hours'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.