मुंबई मनपा निवडणुकांसाठी पोलीस सज्ज
By Admin | Published: February 7, 2017 05:31 AM2017-02-07T05:31:24+5:302017-02-07T05:31:24+5:30
महापालिका निवडणुकांसाठी शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी मुंबई पोलिसांचे सुरक्षा कवच तयार झाले आहे
मुंबई : महापालिका निवडणुकांसाठी शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी मुंबई पोलिसांचे सुरक्षा कवच तयार झाले आहे. राजकीय गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांची एक यादी तयार करण्यात आली आहे. ती मंडळी पोलिसांच्या रडारवर आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या विशेष बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. निवडणुकांदरम्यान घडणाऱ्या सर्व हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी पोलिसांचा एक विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. मुंबईतील विविध पोलीस ठाणे, भरारी पथके यांच्याकडून मिळालेली माहिती या कक्षाद्वारे निवडणूक आयोगाला देण्यात येणार आहे. निवडणूक प्रचारावेळी विशेष दक्षता घेण्यात येणार असून, यात गोंधळ घालणाऱ्यांसह राजकीय गुन्हेगारीची पार्श्वभूमी असणाऱ्यांची एक यादी तयार असून हालचालींवर नजर ठेवण्यात येत असून, गरज भासल्यास प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी पालिका प्रशासन, राज्य निवडणूक आयोग आणि निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यात आल्याचे पोलीस प्रवक्ते पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी सांगितले.