डायरीतील नोंदींच्या ‘कलात्मक अन्वयार्था’ने पोलीस हैराण
By admin | Published: January 3, 2016 02:55 AM2016-01-03T02:55:42+5:302016-01-03T02:55:42+5:30
चिंतन उपाध्यायच्या दिल्लीतील घरातून जप्त केलेल्या डायरी व स्केचेस याबाबत खुलासा त्याला विचारला असता, तो त्यांचा ‘कलात्मक अन्वयार्थ’ तपास अधिकाऱ्यांना सांगत आहे.
- डिप्पी वांकाणी ल्ल मुंबई
चिंतन उपाध्यायच्या दिल्लीतील घरातून जप्त केलेल्या डायरी व स्केचेस याबाबत खुलासा त्याला विचारला असता, तो त्यांचा ‘कलात्मक अन्वयार्थ’ तपास अधिकाऱ्यांना सांगत आहे. कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (जे सध्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर सेलमध्ये आहेत) चिंतनकडे सापडलेले मेमरी कार्ड व पेन ड्राइव्ह तपासण्याचे काम करीत आहेत.
सूत्रांनी सांगितले की, चिंतन नार्को तपासणीसाठी होकार देईल असे वाटत नाही, पण त्याने होकार दिला, तरी तपासणी लॅबमधील सध्याचे काम पाहता, त्याची तपासणी होण्यासाठी किमान महिना तरी लागेल असे वाटते. हेमा उपाध्याय व त्यांचे वकील हरेश भंबानी या दुहेरी खून प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी चिंतनसह पाच जणांना अटक केली आहे.
वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले की, आम्ही चिंतनला त्याच्या डायरीतील विशिष्ट नोंदीबद्दल वा चिथावणीखोर स्केचेसबाबत विचारले असता, तो त्याचा भलताच अर्थ सांगतो आहे. त्या नोंदीचा वा स्केचेसचा हा ‘कलात्मक अन्वयार्थ वा आविष्कार’ असल्याचे तो सांगतो. त्याची नार्को चाचणी घेतल्याशिवाय यातील सत्य बाहेर येणार नाही. सूत्रांनी सांगितले की, पण हे सर्व करण्यासाठी वेळ लागणार आहे. तो नार्को चाचणीला होकार देईल, असे आम्हाला वाटत नाही, पण त्याने संमती दिली, तरी आज घडीला अशा तपासणी करणाऱ्या लॅबमधील अर्ज पाहता, त्याचा क्रमांक येण्यासाठी किमान महिना तरी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर सेलमध्ये बरीच वर्षे कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार सध्या चिंतनची ‘आॅनलाइन’ उकल करण्यात गुंतले आहेत. मेमरी कार्ड, आयपॅड व इतर सामग्रीची उकल करण्यात पवार मदत करीत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, चिंतनने गेल्या वर्षी कौटुंबिक न्यायालयातून हेमापासून घटस्फोट घेतला होता. तिचे कुणाशी तरी संबंध आहेत, असा त्याला संशय होता.
आपल्या घटस्फोटित पत्नीच्या वैयक्तिक आयुष्यात नंतर तो डोकावत होता. त्याने तसे करण्याचे काहीच कारण नव्हते, पण तरीही तो तिच्यावर संशय घेत होता. त्याच्या मित्रांनी तर अशीही माहिती दिली आहे की, हेमा परदेशी कुठेही गेली, तरी ती कुणाला भेटते वा कुठे जाते, असे तिच्यावर तो लक्ष ठेवत असे.