शाळेतून संगणकाची चोरी करणाऱ्यांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:24 AM2020-12-13T04:24:12+5:302020-12-13T04:24:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लॉकडाऊनचा फायदा घेत मालाडमधील पालिकेच्या हिंदी शाळेत जवळपास दीड लाख रुपये किमतीचे संगणक पळविण्यात ...

Police custody for computer thieves from school | शाळेतून संगणकाची चोरी करणाऱ्यांना पोलीस कोठडी

शाळेतून संगणकाची चोरी करणाऱ्यांना पोलीस कोठडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लॉकडाऊनचा फायदा घेत मालाडमधील पालिकेच्या हिंदी शाळेत जवळपास दीड लाख रुपये किमतीचे संगणक पळविण्यात आले हाेते. या प्रकरणी कुरार पोलिसांनी अटक केलेल्या तिघांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली.

हितेश सोलंकी (२८), शेखर सावंत (३८) आणि अंकिता जाधव (२२) अशी अटक तिघांची नावे आहेत. ९ डिसेंबर, २०२० रोजी कुरार मनपा शाळा क्रमांक २ चे इन्चार्ज राजेशकुमार सिंग (५३) यांनी कुरार पोलिसांत तक्रार करीत संगणक आणि सीपीयू मिळून १ लाख ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार दिली.

परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी आणि कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जी. घार्गे आणि पोलीस उपनिरीक्षक धनेश सातार्डेकर यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक तपास करीत शाळेचा सुरक्षारक्षक सावंत याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. त्यात त्यांना अन्य दोघांची नावे समजली. अंकिता आणि हितेश या दोघांमध्ये प्रेमसंबंध असून मौजमजा करण्यासाठी चाेरी केल्याची कबुली त्यांनी दिली.

सावंतच्या मदतीने त्यांनी दोन ते तीन दिवसांत रिक्षातून चोरी केल्याचेही समोर आले. या सर्वांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यांनी अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय असून त्यादृष्टीने पाेलीस चौकशी करीत आहेत.

...................

Web Title: Police custody for computer thieves from school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.