Join us  

ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हप्रकरणी पोलीस अटकेत

By admin | Published: July 05, 2016 1:58 AM

पोलिसाच्या गाडीमुळे झालेल्या अपघातात एक जण जखमी होऊन चार घरांचे नुकसान झाल्याची घटना भायखळा येथे घडली. अटकेच्या भीतीने पसार झालेल्या पोलिसाला पकडण्यासाठी त्याच्या

मुंबई : पोलिसाच्या गाडीमुळे झालेल्या अपघातात एक जण जखमी होऊन चार घरांचे नुकसान झाल्याची घटना भायखळा येथे घडली. अटकेच्या भीतीने पसार झालेल्या पोलिसाला पकडण्यासाठी त्याच्या घरापर्यंत पोहोचलेल्या नागरिकांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या गुन्ह्यांत गणेश गोपीचंद पवारला (२६) अटक केली आहे. गंगाबावडी पोलीस वसाहतीत राहणारे पवार हे ताडदेव सशस्त्र पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. रात्रीच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत भरधाव कारने ते घरी निघाले होते. कारवरचा ताबा सुटल्याने रस्त्यावरील पादचाऱ्याला उडवित कार तेथील झोपड्यांमध्ये घुसली. या भीषण अपघातात सुदैवाने यातील चार कुटुंबे थोडक्यात बचावली. तर पादचारी धर्मेंद्र सिंग हे जखमी झाले असून, चार घरांचे नुकसान झाले. (प्रतिनिधी)