श्रद्धा वालकरची तक्रार पोलिसांनी गांभीर्याने घेतली नाही? माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 08:46 PM2022-11-24T20:46:15+5:302022-11-24T20:47:40+5:30

मुंबईची श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी रोज नवे खुलासे समोर येत आहेत.  मुंबई पोलिसांत श्रद्धाने दोन वर्षापूर्वी आफताब विरोधात तक्रार दिल्याचे समोर आले आहे.

Police did not take Shraddha Walker's complaint seriously? Former Home Minister Dilip walse-Patil reacted to this | श्रद्धा वालकरची तक्रार पोलिसांनी गांभीर्याने घेतली नाही? माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

श्रद्धा वालकरची तक्रार पोलिसांनी गांभीर्याने घेतली नाही? माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

Next

मुंबईची श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी रोज नवे खुलासे समोर येत आहेत.  मुंबई पोलिसांत श्रद्धाने दोन वर्षापूर्वी आफताब विरोधात तक्रार दिल्याचे समोर आले आहे. पण, पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. यावर आता माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.     

Shraddha Walker Murder Case: 'श्रद्धाने लिहिलेलं पत्र गंभीर आहे, मीही ते वाचलं'; देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

अशा प्रकारे अनेक तक्रारी दिल्या जातात. पोलिसांनी यावर तातडीने कारवाई करायला पाहिजे. पण, या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे ही घटना घडली आहे. ज्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली पण कारवाई झाली नाही, त्या पोलीस ठाण्यावर कारवाई झाली पाहिजे. सरकारने ती कारवाई केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील म्हणाले. 

ती तक्रार जर त्यावेळी मागे घेतली असेल तर सरकारने आता असी टीका करणे चुकीचे आहे, असंही दिलीप वळसे पाटील म्हणाले.  

श्रद्धाने लिहिलेलं पत्र गंभीर: देवेंद्र फडणवीस

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील श्रद्धाने लिहिलेलं पत्र गंभीर असल्याचं म्हटलं आहे. मी श्रद्धाने लिहिलेलं पत्र वाचलं. पत्र लिहूनही पोलिसांनी कारवाई का केली नाही, याची चौकशी करणार आहे. मी कोणावरही आरोप करत नाही. मात्र वेळीच कारवाई झाली असती तर तीचा जीव वाचला असता, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. 

दरम्यान, आफताबपासून जीवाला धोका असल्याची तक्रार २०२० मध्येच श्रद्धाने याबाबत नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस स्थानकात दाखल केली होती. आफताब सतत गळा दाबून मारण्याची धमकी देत असल्याचं श्रद्धाने तक्रारीत नमूद केलं होतं. तसेच आफताबच्या परिवाराला याबाबत सर्व कल्पना असल्याचंही श्रद्धाने तक्रारीत म्हटलं होतं. या तक्रारीनंतरही पोलिसांनी कारवाई न केल्यानं आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Police did not take Shraddha Walker's complaint seriously? Former Home Minister Dilip walse-Patil reacted to this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.