प्रत्येक सिग्नलवर पोलीस!
By admin | Published: July 30, 2014 02:07 AM2014-07-30T02:07:51+5:302014-07-30T02:07:51+5:30
मुंबईत सिग्नलवर वाहतूक पोलीस नाही म्हणून सर्रास नियमांचे उल्लंघन करणा:या चालकांना चाप लावणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
Next
मुंबई : मुंबईत सिग्नलवर वाहतूक पोलीस नाही म्हणून सर्रास नियमांचे उल्लंघन करणा:या चालकांना चाप लावणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आता प्रत्येक सिग्नलवर किमान एकतरी वाहतूक पोलीस तैनात केला जाणार आहे. यासाठी वाहतूक पोलिसांची फौज वाढवली जाणार आहे.
तशी माहिती शासनाने उच्च न्यायालयाला दिली आहे. त्यामुळे सिग्नल लागण्याआधीच रस्ता ओलांडणा:या नागरिकांची चांगलीच पंचाईत होणार आहे. भरधाव वेगाने वाहन चालवणा:यांनाही याने लगाम लागेल व वाहतुकीची कोंडी
कमी होण्याची चिन्हे आहेत.
कारण मुंबईत प्रत्येक सिग्नलवर वाहतूक पोलीस तैनात केला जात नाही.
तसेच 2क्क्6 आधी नोंदणी झालेल्या वाहनांची कागदपत्रे व जारी झालेल्या वाहन परवान्यांची कागदपत्रे डिजिटल केली जाणार असल्याचे सरकारी वकील जे.एस. सलुजा यांनी मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्या. एम.एस. सोनक यांच्या खंडपीठाला सांगितले. ते ग्राह्य धरत न्यायालयाने ही सुनावणी 28 ऑगस्टर्पयत तहकूब केली. (प्रतिनिधी)
या प्रकरणी बॉम्बे बार असोसिएशनने जनहित याचिका दाखल केली आहे. मुंबईत दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी होत चालली आहे. चालक भरधाव गाडी चालवतात. याने मुंबईकरांना रस्ता ओलांडताना त्रस होतो. या समस्येने
ज्येष्ठ नागरिकही हैराण आहेत. तेव्हा
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे निर्देश न्यायालयाने
शासनाला द्यावेत, अशी मागणी
याचिकेत करण्यात आली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश शासनाला दिले आहेत.