Join us

पोलिसांनी बोनी कपूर यांना दुबई सोडण्यास केली मनाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 1:24 PM

- दुबई पोलिसांनी चहुबाजूंनी सुरू केलेला तपास आणि वर्तवण्यात येत असलेल्या शंका कुशंका यामुळे अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूभोवतीचे गुढ वाढत चालले आहे. दरम्यान, तपास सुरू असल्याने श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांना दुबई सोडून जाण्यास...

मुंबई - दुबई पोलिसांनी चहुबाजूंनी सुरू केलेला तपास आणि वर्तवण्यात येत असलेल्या शंका कुशंका यामुळे अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूभोवतीचे गुढ वाढत चालले आहे. दुबई पोलिसांनी श्रीदेवींचे वास्तव्य असलेल्या  हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची आणि कपूर कुटुंबीयांची चौकशी केली आहे. दरम्यान, श्रीदेवींच्या पार्थिवाचे पुन्हा शवविच्छेदन होणार असून, तपास सुरू असल्याने श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांना दुबई सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. शनिवारी रात्री श्रीदेवींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये त्यांच्या मृत्यू तोल गेल्याने बाथटबमध्ये पडून झाल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान पोलीस श्रीदेवीच्या मृत्यूच्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दुबई पोलिसांकडून श्रीदेवीचे पती बोनी कपूर आणि हॉटेल स्टाफची चौकशी सुरु आहे. जुमैरा एमिरेट्स टॉवर या हॉटेलच्या रुम नंबर 2201 मध्ये शनिवारी रात्री श्रीदेवी बेशुद्धावस्थेत सापडल्या होत्या.   चौकशी पूर्ण झाल्यानंतर मृतदेह भारतात नेण्याची परवानगी देण्यात येईल असे दुबई पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर या मृत्यूचा फेरतपास करण्याची गरज आम्हाला वाटली असे दुबई पोलिसांनी म्हटले आहे.  ज्या रात्री श्रीदेवी यांचा मृत्यू झाला तेव्हा बोनी कपूर यांनी मला फोन केला होता. मात्र, तेव्हा मोबाईल सायलंटवर असल्यामुळे मी त्यांचा फोन उचलला नाही. माझ्या मते त्यांनी सर्वात पहिला फोन मलाच केला असावा. मी मोबाईल उचलत नसल्यामुळे त्यांनी माझ्या घरच्या लँडलाईनवर फोन केला. तो फोन उचलल्यानंतर बोनी कपूर यांनी मला श्रीदेवी यांच्या मृत्यूबद्दल सांगितले. परंतु परिस्थितीच अशी होती की, आम्ही पुढे फार काही बोलू शकलो नाही, असे अमरसिंह यांनी म्हटले.   

टॅग्स :श्रीदेवी