पोलीस दलाने हुशार अधिकारी गमावला, कोरोनामुळे आझम पटेल यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 07:19 PM2020-08-05T19:19:57+5:302020-08-05T19:20:30+5:30
पटेल हे ‘एसआयडी’मध्ये (राज्य गुप्तवार्ता विभाग) कार्यरत असलेल्या आझम पटेल यांना सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना न्यूमोनिया देखील झाला होता.
२६/११ मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार आणि या हल्ल्यात अनेकांचे जीव वाचवणारे पोलीस निरीक्षक आझम पटेल यांचं कोरोनामुळे आज सकाळी निधन झालं आहे. ते ५० वर्षांचे होते. पटेल हे ‘एसआयडी’मध्ये (राज्य गुप्तवार्ता विभाग) कार्यरत असलेल्या आझम पटेल यांना सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना न्यूमोनिया देखील झाला होता.
२००१ च्या बॅचचे पटेल पोलीस अधिकारी होते. त्यांच्या निधनानंतर मुंबई पोलीस दलाला कोरोनामुळे ५५ पोलिसांना गमवावं लागलं आहे. तर संपूर्ण राज्यात १०८ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पटेल यांनी ७/११ च्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यांनी तपासातून या हल्ल्याचे मोड्यूल उघडकीस आणलं होतं. पटेल यांनी दक्षिण मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात सेवा बजावली होती. त्याचबरोबर दहशतवादी संघटना इसिसची कनेक्शन असल्याच्या संशयातून कल्याणमधील तरुणांवर कारवाई करण्यात देखील यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलाने हुशार अधिकारी गमावला असल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
अर्णब गोस्वामीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार, अटक करण्याची मागणी
रक्षाबंधनसाठी माहेरी आलेली महिला, प्रियकराने गोळ्या घालून केली हत्या
संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी ताब्यात
...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!