मुंबई : फोन पे वर बक्षीस लागल्याची बतावणी करत पोलिसाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून दादर पोलीस तपास करत आहेत. तक्रारदार हे दादर रेल्वे पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत.
.......................................
वृद्ध व्यावसायिकाच्या बँक खात्यावर डल्ला
मुंबई : सीमकार्ड बंद होणार असल्याची भीती घालून ते लाइफटाइम सुरू ठेवण्याचे आमिष दाखवून ठगाने एका वृद्ध व्यावसायिकाच्या बँक खात्यातील रकमेवर हात साफ केला. याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
......................................
घाटकाेपर येथून सव्वा लाखांचा एमडी जप्त
मुंबई : गुन्हे शाखेच्या घाटकोपर पथकाने १ लाख ४० हजार किमतीचा ७० ग्रॅम एमडी जप्त केला. मानखुर्दच्या पनवेल-सायन रोड परिसरात सोमवारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून आरोपीला अटक करण्यात आली.
........................
....