पोलिसांनी अडवलेल्या शेतकऱ्यासाठी मातोश्रीवरुन आला आदेश...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 01:27 PM2020-01-05T13:27:42+5:302020-01-05T13:28:22+5:30

देशमुख हे सदरील शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडलेले होते.

Police get orders from Matoshree for farmers of panvel | पोलिसांनी अडवलेल्या शेतकऱ्यासाठी मातोश्रीवरुन आला आदेश...

पोलिसांनी अडवलेल्या शेतकऱ्यासाठी मातोश्रीवरुन आला आदेश...

Next

मुंबई - शेती आणि कर्जाच्या समस्येबाबत गाऱ्हाणे मांडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न करणारे शेतकरी आणि त्यांच्या 8 वर्षीय लहान मुलीला पोलिसांनी मातोश्री बाहेरून ताब्यात घेतले होते. देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पनवेलवरून वांद्रे येथील मातोश्री येथे आले होते. मात्र, या शेतकऱ्यास पोलिसांनी सोडून द्यावे, असे आदेश मातोश्रीवरुन देण्यात आले आहेत. 

देशमुख हे सदरील शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडलेले होते. तसेच त्यांनी आपली समस्या घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा वारंवार प्रयत्न केला होता. त्यांची भेट होऊ शकली नव्हती. अखेरीस आज ते आपल्या लहान मुलीसह मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले. मात्र, तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले. त्यावेळी या शेतकऱ्यासह छोट्या मुलीला धक्काबुक्की झाली. 

पनवेलमधील या शेतकऱ्यांची व्यथा माध्यमांमध्ये दाखविण्यात आल्यानंतर मातोश्रीवरुन याची दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या शेतकऱ्याची समस्या ऐकून त्यांना सोडून देण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. 

दरम्यान, सदर शेतकऱ्याला आणि त्यांच्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवले. त्यानंतर त्यांना खेरवाडी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. तेथे त्यांच्याकडून प्राथमिक माहिती घेण्यात येत आहे. दरम्यान, मातोश्रीवर भेटण्यासाठी अनेक लोक येत असतात. त्यामुळे त्यांना अटकाव करण्यासाठी असे वागावे लागते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
 

 

Web Title: Police get orders from Matoshree for farmers of panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.