पोर्शे प्रकरणानंतर मुंबईत पोलिसांकडून झाडाझडती; ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’विरुद्ध कारवाई जोमात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 11:22 AM2024-05-30T11:22:24+5:302024-05-30T11:25:13+5:30

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातून धडा घेत मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी करीत ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’विरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

police in action mode in mumbai after porsche case vigorous action against drunk and drive | पोर्शे प्रकरणानंतर मुंबईत पोलिसांकडून झाडाझडती; ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’विरुद्ध कारवाई जोमात

पोर्शे प्रकरणानंतर मुंबईत पोलिसांकडून झाडाझडती; ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’विरुद्ध कारवाई जोमात

मुंबई : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातून धडा घेत मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी करीत ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’विरुद्धपोलिसांनी कारवाई सुरू केली आहे; तसेच पब आणि बारची झाडाझडती घेत कारवाईचा वेग वाढला आहे.

पुण्यातील दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत विशेष मोहिमेअंतर्गत शहरात सर्वत्र गस्त घालण्यात येत आहे. पवई, दादरमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य दिल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. पवईच्या प्रकरणात पोलिसांनी व्यवस्थापक टेक बहादूर आयर (४७) आणि वेटर विकास राणा (३०) यांना बोलावून घेतले. चौकशीत वेटर राणा याने मुलाला दारू दिल्याचे कबूल केले. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला दिलेली दारू जप्त केली असून व्यवस्थापक व वेटरला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. अल्पवयीन मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

लहान मुलाला विकली दारू-

१) विशेष म्हणजे, आस्थापनाने १८ वर्षांखालील ग्राहकांना दारू दिली जाणार नाही, असा फलक लावला होता. 

२) त्यानंतरही त्या मुलाला दारू देण्यात आली होती. अशाच प्रकारे मुंबईतील अन्य ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे.
 
३) ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’विरुद्ध कारवाईचा वेग वाढवला आहे. मंगळवारी ओशिवरा परिसरातही ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: police in action mode in mumbai after porsche case vigorous action against drunk and drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.