Join us

आंदोलनकर्त्यांच्या धरपकडीत पोलिसांच्या दोन ‘बुलेट मिसिंग’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 10:36 AM

मालवणी पोलिसांत नोंद; नामकरणावरुन झाले हाेते आंदाेलन

गौरी टेंबकर-कलगुटकरमुंबई : मालाडच्या क्रीडा संकुलाला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यावरून भाजप, बजरंग दलाने केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या धरपकडीत मुंबईपोलिसांच्या पिस्तूलमधून दोन बुलेट गायब झाल्या आहेत. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी डायरीत नोंद केली असून त्यांचा शोध सुरू आहे.

मालाडच्या मालवणी परिसरात २६ जानेवारी रोजी  टिपू सुलतान मैदानाच्या नामकरणाला विरोध करत उद्घाटनाआधी या परिसरात भाजप, बजरंग दलाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परिमंडळ ११ मधील सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी तसेच वरिष्ठ अधिकारी आणि अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यामध्ये त्यावेळी झटापट झाली. आंदोलकांना पोलीस व्हॅनमध्ये टाकत असताना मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी यांच्या पिस्तूलमधील दोन बुलेट गायब झाल्या आहेत. त्यानुसार याप्रकरणी पोलीस डायरीत नोंद करण्यात आली असून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी परिमंडळ ११ मध्ये ४८ लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

...आणि बुलेट खाली पडल्याआंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे आंदोलनकर्त्याना उचलून गाडीत ठेवत असताना पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी यांच्या कमरेला टांगलेल्या पिस्तूलची क्लिप तुटून त्याची स्प्रिंग बाहेर आली आणि पाच बुलेट खाली पडल्या. त्यातील तीन मिळाल्या मात्र दोघांचा शोध सुरू आहे.    - वरिष्ठ अधिकारी - मालवणी पोलीस ठाणे

टॅग्स :पोलिसमुंबईगुन्हेगारी