बेस्ट बसच्या धडकेत पोलीस निरीक्षक ठार; सांताक्रुझच्या वाकोला परिसरातील घटना

By गौरी टेंबकर | Published: April 14, 2023 03:54 PM2023-04-14T15:54:53+5:302023-04-14T15:56:15+5:30

याप्रकरणी वाकोला पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

police inspector killed in collision with best bus incident in the vakola area of santa cruz | बेस्ट बसच्या धडकेत पोलीस निरीक्षक ठार; सांताक्रुझच्या वाकोला परिसरातील घटना

बेस्ट बसच्या धडकेत पोलीस निरीक्षक ठार; सांताक्रुझच्या वाकोला परिसरातील घटना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बेस्ट बसने दिलेल्या धडकेत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस निरीक्षक म्हणून असलेले  प्रवीण अशोक दिनकर (४३) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनकर हे T3 बिल्डिंग कोळे कल्याण पोलीस लाईन सांताक्रुज पूर्व याठिकाणी राहत होते. दिवस पाळीसाठी कर्तव्यावर जात असताना न्यू मॉडर्न स्कूल जवळ वाकोला मस्जिद येथे सकाळी सव्वा नऊच्या सुमारास बेस्ट बस ( MH01TR4685) रूट क्रमांक - ३९२ चा चालक हयगईने गाडी चालवत होता. त्याच्या पुढील बसमधून प्रवासी उतरत असल्याने दिनकर थांबले. त्याच वेळी पाठीमागून आलेल्या रूट क्रमांक ३९२ बसचा.ब्रेक लागला नाही आणि दिनकर हे दोन बसमध्ये दबले गेले अशी माहिती आहे. या अपघातात दिनकर हे गंभीर जखमी झाले त्यामुळे त्यांना औषध उपचारासाठी वी एन देसाई रुग्णालय येथे नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना सव्वा अकराच्या सुमारास मयत घोषित केले. दिनकर यांच्या नातेवाईकाना याची माहिती दिल्यावर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच वि.न देसाई रुग्णालयात सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, पोलीस उपायुक्त परिमंडळ ८ दीक्षित गेडाम वाकोला पोलीस ठाणे तसेच मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारानी धाव घेतली. याप्रकरणी बेस्ट चालकावर गुन्हा दाखल करत
पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: police inspector killed in collision with best bus incident in the vakola area of santa cruz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.