मुंबई : कोरोनाबाधित पोलिसांना वेळीच उपचार मिळावेत म्हणून मुंबईत सुरू करण्यात आलेले मरोळ आणि मरीन लाइन्स येथील कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. कोरोनाबाधित पोलिसांची संख्या घटत असल्यामुळे प्रशासनाकड़ून हे पाऊल उचलण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांसाठी आता फक्त कलिना येथे स्वतंत्र कोविड सेंटरसह ९ रुग्णालयांत उपचार मिळणार आहेत.
मुंबईत आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. तर ६१ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. दिवसेंदिवस पोलिसांच्या मृत्यूचा वाढता आकडा चिंता वाढविणारा आहे. सुरुवातीच्या काळात पोलिसांसाठी जिथे रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नव्हती. तिथे जीव धोक्यात घालून कोरोनासंबंधी सर्व प्रकारची कर्तव्ये बाजावत असलेल्या पोलीस दलात संतापाचे वातावरण पसरले होते. काही पोलिसांनी आपली व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून वरिष्ठांच्या आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. पोलीस प्रशासनाकड़ून रुग्णवाहिकेसह पोलिसांसाठी मरोळ, मरीन लाईन आणि कलिना येथील कोळे कल्याण येथे स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्यात आले. तसेच पोलिसांसाठी स्वतंत्र असा कोविड हेल्पलाइन कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला. २८ एप्रिलपासून या कक्षाद्वारे पोलिसांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात झाली. या कक्षाचाही पोलिसांना आधार ठरला.
सद्यस्थितीत कोरोनाबाबत असलेली भीती कमी होत असल्याने सौम्य लक्षणे असलेल्या पोलिसांना घरीच विलगीकरणाचा पर्याय सुचवला जात आहे. ज्यांना जास्त गरज आहे अशाच पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांचे दाखल होण्याचे प्रमाण कमी होत असल्याने पर्यायी मरीन लाइन आणि मरोळ येथील कोविड सेंटर बंद करण्यात आले आहेत. यात मरोळ केंद्रातील उत्तम नियोजनामुळे पोलिसांचे कोरोनावर मात करण्याचे प्रमाण अधिक होते. जे जे रुग्णालयातील ओपीडीही बंदसर जे जे रुग्णालयामधील गेट क्रमांक ६ येथील कोविड १९ फीवर ओपीडी सोमवारपासून कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्याने बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी सोमवारी, बुधवारी व शुक्रवारी या दिवशी पहिल्या मजल्यावरील मुख्य ओपीडी दुपारी ३ ते ५ या वेळेत सुरू राहणार असल्याने पोलिसांनीही याच वेळेत येथे तपासणीसाठी यावे अशी माहिती जे जे मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव भोळे यांनी दिली आहे.११ हजार पोलिसांची कोरोनावर मातराज्यभरात १४५३ पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण १३ हजार ७१६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी ११ हजार ४९ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. यात १ हजार ११० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात १५ अधिकाºयांसह १३९ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर सद्यस्थितीत २ हजार ५५२ पोलिसांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.