Join us

हुक्का पार्लर बंदीवर पोलिसांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 1:53 AM

गोरेगाव (पश्चिम) भागात रात्रभर चालवण्यात येणाºया हुक्का पार्लरवर आता पोलिसांनी आणि महानगरपालिकेने कारवाईसाठी कंबर कसली आहे.

मुंबई : गोरेगाव (पश्चिम) भागात रात्रभर चालवण्यात येणाºया हुक्का पार्लरवर आता पोलिसांनी आणि महानगरपालिकेने कारवाईसाठी कंबर कसली आहे. सर्व वरिष्ठ पोलिसांची बैठक घेऊन बोरीवली ते गोरेगावमधील बेकायदा हुक्का पार्लर आणि बार रात्रभर सुरू राहू नयेत. तसेच हुक्का पार्लर व बारमालकांनी बेकायदा धंदा चालवल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.‘लोकमत’ने बेकायदा हुक्का पार्लरची दखल घेणारे वृत्त शनिवारी प्रकाशित केले. त्यानंतर पोलीस आणि महापालिकेला जाग आली आहे. मोतीलाल नगर, लिंक रोड, एस. व्ही. रोड, जवाहर नगर या ठिकाणी रात्रभर चालणाºया अनेक बेकायदेशीर हुक्का पार्लर व बारमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यावर तोडगा किंवा ठोस कारवाई व्हावी, यासाठी स्थानिकांनी अनेक पत्रव्यवहार केले आहेत; परंतु आता पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतल्याने स्थानिकांनी सुटकेचा श्वास टाकला आहे. पिकासो, कसबा, चांबुरी (काफिला), फिस्ट इंडिया, केओस, रॉयल, चायपानी आणि चाओस या हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.महापालिकेच्या साहाय्याने चार दिवसांपासून कारवाई सुरू आहे. दिवाळीपूर्वीदेखील डान्स बारवर कारवाई करण्यात आली होती. जश्न आणि मुंबई प्लॅनेट बारवर अनधिकृत बांधकामावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. यात १५ आॅर्केस्ट्रा बार आणि हुक्का पार्लरवर महापालिकेकडून कारवाई झालेली आहे. काही दिवसांपूर्वी रॉयल बारचे साहित्य महापालिकेने हस्तगत केले. तरुणीवर मारहाण प्रकरणात बारच्या मॅनेजर आणि संबंधित लोकांना अटक करून कोर्टात हजर केले आहे. तसेच केओस हुक्का पार्लरमध्ये तरुणाची हत्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी दिली.

टॅग्स :पोलिस