हत्याप्रकरणात पोलीस अधिकाऱ्याची जन्मठेप कायम ; प्रेयसीची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:07 AM2021-02-27T04:07:27+5:302021-02-27T04:07:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्रेयसीच्या मुलाची हत्या केल्याच्या आरोपावरून सहायक पोलीस आयुक्त शिवाजी नरवणे (सध्या निवृत्त) याची जन्मठेपेची ...

Police officer's life sentence upheld in murder case; The release of the beloved | हत्याप्रकरणात पोलीस अधिकाऱ्याची जन्मठेप कायम ; प्रेयसीची सुटका

हत्याप्रकरणात पोलीस अधिकाऱ्याची जन्मठेप कायम ; प्रेयसीची सुटका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रेयसीच्या मुलाची हत्या केल्याच्या आरोपावरून सहायक पोलीस आयुक्त शिवाजी नरवणे (सध्या निवृत्त) याची जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम केली, तर मुलाच्या आईविरोधात पुरेसे पुरावे नसल्याने तिची जन्मठेपेची शिक्षा रद्द करत सुटका केली.

शिवाजी नरवणे आणि त्याची प्रेयसी नंदा झोडगे यांना झोडगे हिचा मुलगा रोहन याची हत्या केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने २०१९ मध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. दोघांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सुनावणीत नरवणे याने हत्येचा कट रचल्याचे पुरावे असले तरी झोडगे या हत्येत सहभागी आहे, हे सिद्ध करणारे पुरावे नाहीत, असे न्या. साधना जाधव व न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने म्हटले.

नरवणे आणि झोडगे यांच्यात रोहनच्या हत्येचा कट शिजल्याचे पुरावे पोलिसांकडे नाहीत. घटना घडली त्यावेळी झोडगे घरी नव्हती, हे शेजाऱ्यांनी दिलेल्या साक्षी आणि मोबाइल लोकेशनवरून सिद्ध होते, असा युक्तिवाद झोडगे हिच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी न्यायालयात केला. सरकारी वकिलांनी सादर केलेल्या पुराव्यांवरून हत्या झाली त्यादिवशी झोडगे आणि आरोपी एकत्र नव्हते, हे सिद्ध होते. पुरुष खोटे बोलू शकतात. तथापि, आजूबाजूची स्थितीच सारे सांगते आणि पाठी खुणा सोडून जाते, हे या प्रकरणात लागू होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

२५ ऑक्टोबर २०१३ मध्ये घटना घडली तेव्हा नरवणे सहायक पोलीस आयुक्तपदी कार्यरत होते. झोडगे तिच्या मुलाबाबत तक्रार करायला वारंवार टिळकनगर पोलीस ठाण्याला जात असे. त्या काळात ती आणि नरवणे एकमेकांच्या जवळ आले. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, रोहन हा मद्यपी होता आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. तो सतत त्याच्या आईला त्रास देत असे. झोडगे ही होमिओपॅथी डॉक्टर होती. रोहन त्याच्या टिळकनगर येथील घराबाहेर मृतावस्थेत आढळला आणि मृतदेहाशेजारी नरवणे होता. तपासाअंती पोलिसांनी नरवणेसह झोडगे हिला अटक केली होती. हत्येच्या आदल्या रात्री रोहनचे झोडगेबरोबर भांडण झाले तेव्हा तिथे नरवणे आणि झोडगेची मुलगी नेहा उपस्थित होते. भांडणानंतर झोडगे आणि नेहा घर सोडून गेल्या. त्यावेळी रात्री रोहनसोबत नरवणे होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो मृतावस्थेत आढळला, असे न्यायालयाने म्हटले.

'एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने कुख्यात रोहनवर कायद्यानुसार कारवाई करण्याऐवजी त्याची हत्या करून पुरावे नष्ट केले, असे निरीक्षण नोंदवताना आम्हाला दुःख होत आहे. नरवणे हा दयेस पात्र नाही,' असे म्हणत न्यायालयाने नरवणेची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली.

Web Title: Police officer's life sentence upheld in murder case; The release of the beloved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.