नवीन पनवेलमध्ये पोलिसांचे संचलन

By admin | Published: October 12, 2014 01:06 AM2014-10-12T01:06:04+5:302014-10-12T01:06:04+5:30

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी रॅली, सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करीत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

Police operation in Panvel | नवीन पनवेलमध्ये पोलिसांचे संचलन

नवीन पनवेलमध्ये पोलिसांचे संचलन

Next
>पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी रॅली, सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करीत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर पोलिसांनीही शनिवारी पनवेलमध्ये संचलन करून एका प्रकारे शक्ती प्रदर्शन केले. मात्र उद्देश मात्र पनवेलकरांनी निर्भयपणो मतदान करावे त्याचबरोबर निवडणुक नियमांचे उल्लंघन त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेचे बांधा असणा:यांवर वचक हा होता. हा मार्च पाहण्यासाठी पनवेलकरांनी एकच गर्दी केली होती.
पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजप विरू ध्द शेकाप नव्हे तर एके काळचे सहकारी असलेल्या ठाकूर विरू ध्द पाटील अशी थेट लढत आहे. या व्यतिरिक्त इतर सर्व पक्ष निवडणुक रिंगणात असून प्रत्येक पक्ष व उमेदवारांचा आपपल्या भागात जोर आहे. राजकीय समिकरणो बदल्याने त्याचबरोबर सर्व पक्ष निवडणुक लढवीत असल्याने पनवेलमध्ये ख:या अर्थाने राजकीय शक्तीची लढाई आहे. जास्तीत जास्त मत मिळवून आपली व पक्षाची ताकद दाखवून देण्याची उमेदवार आणि नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी अतिशय खबरदारी घेतली आहे. परिमंडळ-2चे पोलिस उपायुक्त संजयसिंह येणपुरे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव भोसले, जनार्दन थोरात, o्रीराम मुल्लेंमवार हे अधिकारी स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसात मतदारसंघात कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. सर्व ठिकाणी अतिशय शांततेत प्रचार प्रत्येक पक्षाचा चालला असून याचे क्रेडीट हे पोलिसांना जात असल्याचे निवडणुक अधिका:यांनीही मान्य केले आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये याकरीता पोलिसांना आगोदरच सर्व राजकीय पक्षांची समन्वय बैठक घेऊन सुचना दिल्या होत्या. त्यानुसार आजर्पयत त्याचे तंतोतंत पालन होत आले आहे. 15 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असुन या दिवशी कोणताहइी अनुचित प्रकार घडू नये. त्याचबरोबर मतदारांना निर्भयपणो मतदान करता यावे हा उद्देश साध्य करण्यासाठी पोलिसांना खबरदारी घेतली आहे. त्याकरीता आज पनवेलमध्ये संचलन करण्यात आले. 
पनवेल शहर पोलिस ठाण्यापासून हा मार्च सुरू झाला तो पनवेल नगरपालिका, टपाल नाका, उरण रोड, पंचरत्न हॉटेल, शिवाजी चौक, बल्लाळेश्वर मंदिर, बसस्थानक येथून नवीन पनवेल परिसरात गेला. तीन पोलिस निरीक्षक, 5 सहाय्यक पोलिस निरीक्षक 22 पोलिस उपनिरीक्षक 2क्क् कर्मचारी, एसआरपी, नवी मुंबई पोलिसांचा समावेश हाता. दररोज राजकीय पक्षांच्या रॅली पाहून पाहून कंटाळलेल्या पनवेलकरांना आज पोलिसांची  शिस्तबध्द रॅली पहावयास मिळाली. (वार्ताहर)
 
च्पनवेल मतदारसंघात निवडणुक प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडावी याकरीता पोलिसांनी अतिशय नियोजनबध्द बंदोबस्त लावला आहे. 
च्संवेदनशील ठिकाणी अतिशय लक्ष केंद्रीत करून त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करणा:यावर करडी नजर ठेवली आहे. 
च्असे प्रकार घडू नयेत याकरीता खाकी दहशत पसरविण्यात आली असून गावोगाव बैठका घेऊन निवडणुक प्रक्रीयेत बाधा आणणारे त्याचबरोबर कायदा व सुव्यस्थेला धोका पोहचवणा:यांची गय केली जाणार नाही असा सज्जड दम वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी त्यांच्या हद्दीत दिला आहे. 

Web Title: Police operation in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.