मुंबई : ईद-ए-मिलाद व ख्रिसमस या सणांचा बंदोबस्त पार पडल्यानंतर मुंबई पोलीस आता ३१ डिसेंबरच्या बंदोबस्ताच्या तयारीला लागले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी विशेष बंदोबस्ताचे आयोजन करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.३१ डिसेंबरला सुमारे ३० हजारांवर पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तात तैनात असणार आहे. ईद-ए-मिलाद आणि नाताळ हे दोन्ही सण लागोपाठ आल्याने आणि त्याला जोडून शनिवार, रविवार असल्याने मुंबईकर सुट्टी ‘एन्जॉय’ करीत आहेत. आता पोलिसांवर ३१ डिसेंबरच्या बंदोबस्ताची जबाबदारी आहे. या वर्षीदेखील दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
नववर्षाच्या बंदोबस्तासाठी पोलिसांची तयारी
By admin | Published: December 27, 2015 1:10 AM