Join us

संभाजी भिडे गुरुजींच्या मुंबईतील व्याखानाला पोलिसांनी नाकारली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2018 5:36 PM

कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या भिडे गुरुजींचं मुंबईतील नियोजित व्याख्यान पुढे ढकलण्यात आले आहे

मुंबई - कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या भिडे गुरुजींचं मुंबईतील नियोजित व्याख्यान पुढे ढकलण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. मुंबईतील लालबाग येथे 7 जानेवारी रोजी व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पण पोलिसांनी परवानगी नाकारल्याने व्याखान रद्द करण्यात आल आहे. 

लालबागमधील मेघवाडीत ७ जानेवारीला आयोजित भिडे गुरूजींचे व्याख्यान रद्द करण्यात येत आहे. सुमारे १० हजार लोक व्याख्यानाला येणार होते अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मुंबई विभाग प्रमुख बळवंत दळवी यांनी सांगितलं आहे.  मुंबईचे वातावरण गढूळ झाले आहे. मराठा, ब्राम्हण आणि दलित अशी फूट पाडण्याचा प्रयत्न समाजविघतक संघटना करत आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केली. पोलिसांच्या विनंतीवरून व्याख्यान पुढे ढकलत आहोत. खरा सूत्रधार भेटल्यावर पुन्हा सभेचे आयोजन केले जाईल अशी माहिती त्यांनी दिली. 

बामसेफ, संभाजी ब्रिगेड यांनी एल्गार परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यामुळे कोरेगाव भीमा हिंसाचारात त्यांचा हात असण्याची शक्यता आहे, असा आरोपही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने केला आहे. खुल्या दिलाने चौकशीस सामोरे जाण्यासाठी प्रतिष्ठान तयार आहे. सरकारची तपासयंत्रणा उत्तर देईल असंही ते म्हणाले आहेत. 

कोरेगाव-भीमा हिंसाचार झाल्यानंतर, त्यात भिडे गुरुजींचं नाव गोवण्यात आले. त्यामुळे जातीयवादी वाद-विवाद, तसेच दंगल होऊ नये म्हणून व्याख्यान पुढे ढकलण्याची भूमिका घेतली असल्याचे बलवंत दळवी बोलले आहेत.

कोरेगाव भीमा प्रकरणात भिडे गुरूजींचे नाव गोवले जात आहे. त्यांच्या सभा सातत्याने सुरू आहेत. त्यांनी याप्रकरणात कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मुळात  ते पुण्यात नसून सांगलीत होते अशी माहिती चेतन बारस्कर यांनी दिली आहे.

टॅग्स :संभाजी भिडे गुरुजीभीमा-कोरेगाव