पोलीस, आरपीएफमुळे मालवाहतूक सुरक्षित सुरू
By चंद्रकांत शेळके | Published: April 12, 2020 07:08 PM2020-04-12T19:08:59+5:302020-04-12T19:11:18+5:30
मध्य रेल्वे मार्गावरून मालगाडीद्वारे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली जात आहे.
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने २४ मार्चपासून एक्सप्रेस, उपनगरीय लोकल बंद केल्या आहेत. या काळात फक्त २४ तास मालगाडीची वाहतूक सेवा सुरु आहे. मध्य रेल्वे मार्गावरून मालगाडीद्वारे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली जात आहे. या मालगाडयांना सुरक्षा देण्यासाठी आरपीएफ जवान, पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी रेल्वे मंडळाने भारतीय रेल्वे सेवा बंद केली. त्याचपाठोपाठ 22 मार्च पासून आंतरराष्ट्रीय विमाने रद्द केली आहे. त्यानंतर 24 मार्चला मध्यरात्रीपासून देशांतर्गत विमाने रद्द करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात लहान पार्सल आकारातील वैद्यकीय साहित्य, वैद्यकीय उपकरणे, अन्न इत्यादीसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक बंद पडू नये, यासाठी मध्य रेल्वेनी पार्सल वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे अशा पाच विभागातून वेगवेगळ्या ठिकाणी मालगाड्यांची सेवा सुरु आहे. यावर अत्यावश्यक सेवेमध्ये येणाऱ्या आरपीएफ जवान , रेल्वेचे अधिकारी, वैद्यकीय विभाग, राज्य पोलिस आणि नागरी प्रशासनाबरोबर सज्ज आहे. रेल्वे सेवा बंद आहे. यासह इतर अनेक विभाग बंद आहेत. त्यामुळे याविभागाची सुरक्षा आणि रेल्वेच्यासंपत्तीचे संरक्षण करण्याची जबाबदारी सुरक्षा विभागावर आहे. कोच, यार्ड्स, लोकोमोटिव्ह्ज, सिग्नलिंग इन्फ्रास्ट्रक्चर, स्टॅबल्ड रॅक, स्थानक, रिले रूम, वॅगन स्टॉक इत्यादी संपत्तीचे संरक्षण केले जात आहे. जीवनावश्यक वस्तुंना पुरवठा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून माल वाहतूक सुरू आहे. औषधे, साखर, धान्य, इंधन, कोळसा यांची वाहतूक सुरु आहे. यासह सॅनिटायझर्स, साबण व मास्क यांचे सुरु आहे. या सामग्रीची देखरेख आरपीएफ, पोलीस यांच्याकडून केली जात आहे.