Join us

पळून जाणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2018 9:20 PM

दिंडोशी न्यायालयात सुनावणीसाठी आणलेला आरोपी जात होता पळून

 मुंबई - आज दुपारी दिड वाजताच्या सुमारास ठाणे कारागृहातून दिंडोशी न्यायालयात सुनावणीसाठी आणलेला अहमद उर्फ शबलु हुसेन शहा (वय - २४) हा पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी मालाड पूर्वे येथे कोम्बिंग ऑपरेशन करून शहाच्या पुन्हा मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम २२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहा हा मालाड पूर्व येथील पठाणवाडीतीळ चक्कीवाला चाळीत  राहणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला शहाविरोधात भा. दं. वि. कलम ३०७ आणि ५०६ (२) अन्वये गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी त्याला १७ ऑक्टोबर २०१७ रोजी अटक करण्यात आली आहे. दिंडोशी न्यायालयात त्याला ठाणे कारागृहातून सुनावणीसाठी आणले असता दुपारी दिडच्या सुमारास  शहा हातातील बेडी काढून पळून गेला होता. त्यानंतर  कुरार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नाईक, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घार्गे आणि त्यांच्या पथकाने मालाड पूर्वेस संजय नगर परिसरात कोम्बिंग ऑपरेशन करून आरोपीच्या सायंकाळी ६ वाजता मुसक्या आवळल्या. तब्बल ४ साडेचार तासांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांना फरार आरोपीचा माग काढण्यास यश लाभले.