पोलिसांचा यंदाही बोट पार्टीला ‘रेड सिग्नल’!
By Admin | Published: December 28, 2015 03:43 AM2015-12-28T03:43:32+5:302015-12-28T03:43:32+5:30
चांदण्याच्या जोडीला उसळत्या लाटाच्या साक्षीने नववर्षाचे स्वागत करण्याची मुंबईकरांची इच्छा यावेळीही पूर्ण होणार नाही. सुरक्षितेच्या दृष्टीने पोलिसांनी यंदाही बोट पार्टी करण्यास मज्जाव केला आहे.
मुंबई : चांदण्याच्या जोडीला उसळत्या लाटाच्या साक्षीने नववर्षाचे स्वागत करण्याची मुंबईकरांची इच्छा यावेळीही पूर्ण होणार नाही. सुरक्षितेच्या दृष्टीने पोलिसांनी यंदाही बोट पार्टी करण्यास मज्जाव केला आहे.
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गेटवे परिसरात येणाऱ्या पर्यटकांना लक्षात ठेऊन, समुद्र किणाऱ्यावर बोट पार्टी केली जाते. मात्र, ‘२६/११’ च्या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव बोटींवर पार्टी करण्यास बंदी घालण्यात आली होती. या वर्षी पुन्हा एकदा मुंबई पोलीसांनी बोटींवरच्या पार्टीला रेड सिग्नल दाखवून परवानगी दिली नाही. त्यामुळे ३१ डिसेंबरला संध्याकाळी साडेसहा ते पहाटे ६ वाजेपर्यंत समद्र किनाऱ्यावर कोणतेही बोट पार्टी करण्यास बंदी घातली आहे.
एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्सवरही ५ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. त्या शिवाय ३१ डिसेंबरच्या रात्री बलुन्स आणि लेझर लाइटचे नियोजन करणाऱ्यांना त्याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांना द्यावी लागणार आहे, तसेच व्हिसा आणि पासपोर्ट संपल्यानंतर, कोणत्याही विदेशी व्यक्तीने शहरामध्ये वास्तव्य केलेले आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेश हॉटेल्स, लॉज मालकांना जारी
केले आहेत. घातक शस्त्रे, वस्तू, विस्फोटके घेऊन फिरणाऱ्या व्यक्तिंवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)