पोलिसांना ‘सिंघम’ची साथ

By admin | Published: June 18, 2017 02:55 AM2017-06-18T02:55:24+5:302017-06-18T02:55:24+5:30

सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी बॉलीवूडचा ‘सिंघम’ अजय देवगण आता मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी उतरला आहे. त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती व त्यासाठी पोलिसांशी

Police with 'Singham' | पोलिसांना ‘सिंघम’ची साथ

पोलिसांना ‘सिंघम’ची साथ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी बॉलीवूडचा ‘सिंघम’ अजय देवगण आता मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी उतरला आहे. त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती व त्यासाठी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करीत असल्याचा व्हिडीओ बनविण्यात आला आहे. सायबर सेलच्या वतीने ही चित्रफीत बनविण्यात आली आहे.
अजय देवगनने शुक्रवारी मुंबईचे पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांची भेट घेतली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी चित्रफीत प्रसारित केली आहे. त्यामध्ये अजय देवगनला मोबाइलवर एक कॉल येतो, त्यामध्ये तरुणी बॅँक खाते क्रमांक, ओटीपी, पासवर्डची विचारणा करते, त्याला अजय प्रत्युत्तर देत पोलिसांचे संपर्काचे क्रमांक सांगत ती खोटारडी असल्याचे स्पष्ट करतो.
बँक कर्मचारी असल्याचं सांगून कुणी तुमची वैयक्तिक माहिती मागत असल्यास किंवा कार्ड ब्लॉक करण्याच्या नावावर ‘वन टाइम पासवर्ड (ओटीपी), सीव्हीव्ही किंवा पासवर्ड मागत असेल, तर तुम्ही त्यांना तुमचा पासवर्ड अजिबात देऊ नका, असे आवाहन अजय करतो.

Web Title: Police with 'Singham'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.