मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:08 AM2021-05-05T04:08:11+5:302021-05-05T04:08:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात संचारबंदी लागू असतानाही नागरिक मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या संख्येने बाहेर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात संचारबंदी लागू असतानाही नागरिक मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडताना दिसत आहे. अशात वारंवार समजावूनही नागरिक ऐकत नसल्याने मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्यांवर पाेलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी शिवाजी पार्क परिसरात कारवाई करण्यात आली.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करुनही नागरिक ऐकायला तयार नाहीत. विनाकारण घराबाहेर पडू नका, असे पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येत असूनही नागरिक काहीना काही कारण काढून बाहेर पडत आहे. त्यातच मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र दादरच्या शिवाजी पार्क परिसरात पहावयास मिळत आहे. अखेर पाेलिसांनी कारवाईचा बडगा उगारत साेमवारी सकाळी शिवाजी पार्क परिसरात फिरणाऱ्यांंना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांंना तंबी देऊन सोडण्यात आले. मुंबईत सर्वत्र अशी कारवाई करण्यात येत असून समज देऊनही न ऐकणाऱ्यांवर कठाेर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पाेलिसांनी दिला.
................................................