Police: अंमलदारांचा उपनिरीक्षक होण्याचा मार्ग अखेर मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 10:53 AM2022-06-20T10:53:38+5:302022-06-20T10:54:01+5:30

Police: पोलीस दलात भरती झाल्यानंतर उपनिरीक्षक होऊ इच्छिणाऱ्या अंमलदारांसाठी विभागीय मर्यादित मुख्य परीक्षेसाठीचा ‘मुहूर्त’ आता निश्चित झाला आहे. येत्या ३० जुलैला राज्यभरातील ६ परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा होणार आहे आहे.

Police: The way is finally clear for the officers to become sub-inspectors | Police: अंमलदारांचा उपनिरीक्षक होण्याचा मार्ग अखेर मोकळा

Police: अंमलदारांचा उपनिरीक्षक होण्याचा मार्ग अखेर मोकळा

Next

- जमीर काझी
 अलिबाग : पोलीस दलात भरती झाल्यानंतर उपनिरीक्षक होऊ इच्छिणाऱ्या अंमलदारांसाठी विभागीय मर्यादित मुख्य परीक्षेसाठीचा ‘मुहूर्त’ आता निश्चित झाला आहे. येत्या ३० जुलैला राज्यभरातील ६ परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा होणार आहे आहे. २५० पदे भरली जाणार असून त्यासाठी पूर्व परीक्षेतून २,७०० जणांना पात्र ठरविण्यात आले आहे. ३०० गुणांची मुख्य व १०० गुणांची शारीरिक चाचणीतून अंतिम उमेदवार निवडले जाणार आहेत. परीक्षेसाठी पात्र ठरलेल्यांना अर्ज करण्यासाठी २९ जूनपर्यंत मुदत  आहे.
    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस दलात अंतर्गत विभागीय उपनिरीक्षक पदासाठी गेल्यावर्षी जाहिरात काढली होती. एकूण २५० जागांसाठी सुमारे १४ हजारांवर उमेदवारांनी अर्ज केले होते. पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी खात्यातील चार वर्षाची नियमित सेवा व बारावी पास होऊन भरती झालेल्या   अंमलदारांना पाच वर्षांची नियमित सेवा पूर्ण असणे, अशी अट असलेल्या या परीक्षेतून पूर्वपरीक्षेतून २,७०० जणांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविले. मात्र त्याची तारीख निश्चित न झाल्याने इच्छुकांमध्ये  काहीशी अस्वस्थता निर्माण झाली होती. लेखी परीक्षा ३० जुलैला वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे. ३०० गुणांचा पेपर असून दीड तासाचा कालावधी असेल. १५ दिवसांच्या अंतराने केंद्रावर  शारीरिक चाचणी घेतली जाईल.

मुख्य परीक्षेसाठीची केंद्रे
विभागीय उपनिरीक्षक पदासाठी मुख्य परीक्षा मुंबई, पुणे, अमरावती, नाशिक, औरंगाबाद व नागपूर या ६ केंद्रांवर होणार आहे. उमेदवारांनी यापैकी एक केंद्र निश्चित करून ऑनलाइन अर्जामध्ये त्याचा संकेत क्रमांक नोंदवायचा आहे, त्याच ठिकाणी त्याला परीक्षा देता येईल.

उपनिरीक्षक पदापर्यंत बढती
आणखी एकदा अखेरची परीक्षा होणार पोलीस  कॉन्स्टेबलला  पदोन्नतीतून उपनिरीक्षक पदापर्यंत बढती देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे  पीसआय भरतीसाठीचे पूर्वीचे ५०:२५:२५ हे  सूत्र रद्द करण्यात आले आहे. 
आता ५० टक्के पदे थेट सरळसेवा भरतीतून तर ५० टक्के बढतीतून भरली जातील. खात्यात कार्यरत पोलिसांना डिसेबर २०२३ पर्यंत विभागीय उपनिरीक्षकाच्या परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे यानंतर केवळ एकदाच विभागीय परीक्षा होणार आहे.

Web Title: Police: The way is finally clear for the officers to become sub-inspectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.