मुंबई : ‘इंडिया’ बैठकीसाठी विमानतळ परिसर आणि वाकोला येथील ग्रॅण्ट हयात हॉटेल येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बैठकीसाठी देशभरातील प्रमुख पक्षांचे नेते, मुख्यमंत्री येणार असल्याने त्यांच्या सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
विमानतळाबरोबरच हे नेते ज्या हॉटेलमध्ये उतरले आहेत, तिथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये प्रमुख नेते उतरणार असल्याने या हॉटेलला अक्षरशः सुरक्षेचा वेढा घालण्यात आला आहे. बैठकीत सहभागी होणाऱ्या काही नेत्यांना एसपीजीची तर काही नेत्यांना झेड प्लस सुरक्षा असल्याने मुंबई पोलिसांनीही सुरक्षेची विशेष काळजी घेतली आहे. मुंबई पोलिस दलाबरोबरच राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.