Join us

पोलिसाच्या हल्ल्यात पोलीस पत्नी जखमी

By admin | Published: April 23, 2015 6:57 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आॅपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाच्या पत्नीवर शेजारी राहणाऱ्या पोलिसाने जीवघेणा हल्ला केला

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आॅपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाच्या पत्नीवर शेजारी राहणाऱ्या पोलिसाने जीवघेणा हल्ला केला. ही घटना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास वरळी पोलीस वसाहतीत घडली. या हल्ल्यात पोलीस पत्नी गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर वरळीच्या पोद्दार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर हल्लेखोर पोलिसाला हत्येचा प्रयत्न, धमक्या, मारहाणीच्या गुन्ह्यात गजाआड करण्यात आले. अंकुश करंजे (५३) असे हल्लेखोराचे नाव आहे. करंजे दादर पोलीस ठाण्यात साहाय्यक फौजदार म्हणून नेमणुकीस आहे.वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी पोलीस पत्नीचे नाव नीता नवार (३५) आहे. त्या वरळी पोलीस वसाहतीत ४१ नंबर इमारतीत राहतात. त्यांचे पती नितीन नवार सशस्त्र पोलीस दलात नेमणुकीस असून सध्या त्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आॅपरेटर म्हणून करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी वादातून नितीन यांनी शेजारी राहणाऱ्या करंजे याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याच रागाने करंजे दुपारी नवार यांच्या घरात घुसला आणि नीता यांच्याशी वाद घालत चाकूने वार केले. (प्रतिनिधी)