मुंबई : पोलीस वसाहतीच्या दुरवस्थेमुळे पोलीस कुटुंबीयांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मात्र लवकरच पोलिसांची ही समस्या सुटणार असून, पोलिसांनादेखील सुसज्ज घर मिळणार आहे. घाटकोपर पोलीस वसाहतीपासून याची सुरुवात झाली आहे. पोलीस वसाहतींच्या दुरवस्थेबाबत पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पोलिसांच्या समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर वाचला होता. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. त्याची सुरुवात झाली असून, पूर्व उपनगरातील घाटकोपर येथील पोलीस वसाहतीत ओपन जिम, विद्यार्थ्यांसाठी सर्व सोईयुक्त अभ्यासिका केंद्र, लहान मुलांसाठी खेळाचे मैदान, साहित्य अशा सुविधा देण्यात येणार आहेत. त्यानिमित्त परिमंडळ ७चे उपायुक्त राजेश प्रधान यांच्या हस्ते येथील भूमिपूजन करण्यात आले. (प्रतिनिधी)
पोलीस वसाहत होणार ‘चकाचक’
By admin | Published: October 12, 2016 5:22 AM