Join us

पोलीस महिलेची आत्महत्या; प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 5:28 AM

नायगाव पोलीस वसाहतीत २२ वर्षांच्या महिला पोलीस शिपायाने साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.

मुंबई : नायगाव पोलीस वसाहतीत २२ वर्षांच्या महिला पोलीस शिपायाने साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. मंजू वसंत गायकवाड असे महिला पोलीस शिपायाचे नाव आहे. त्या नायगाव सशस्त्र दलातील कर्मचारी असून वाहतूक शाखेत कार्यरत होत्या.मुळच्या नाशिकच्या असलेल्या गायकवाड या नायगाव बीडीडी चाळीतील इमारत क्रमांक ३ मध्ये बहिणीसोबत राहात होत्या. एक बहीण पोलीस खात्यात असून त्याच इमारतीत राहाते. तर दुसरी पालिकेत कामाला आहे. अन्य एका बहिणीची तब्येत बरी नसल्याने त्या घरीच असते. गायकवाड यांचा भाऊ टाटा रुग्णालयात सुरक्षारक्षक आहे.मंगळवारी सकाळी मोठी बहीण ही भावाला जेवणाचा डबा देण्यासाठी रुग्णालयात गेली. त्याचदरम्यान घरात एकट्या असलेल्या गायकवाड यांनी साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. बहीण घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव नाशिक येथे नेले आहे. गायकवाड यांचे एका पीएसआयच्या मुलासोबत प्रेमसंबध होते. दोघेही लग्न करणार होते. याच प्रेमसंबंधातून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, त्यांच्या प्रेमविवाहाला कुटुंबीयांचा विरोध नव्हता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी आत्महत्या का केली, याचा शोध पोलीस घेत आहेत. घटनास्थळी सुसाईड नोट सापडलेली नाही.

टॅग्स :आत्महत्यागुन्हा