Join us

सांताक्रूझमध्ये पोलिसाला मारहाण

By admin | Published: October 13, 2016 5:55 AM

देवी विसर्जनादरम्यान मंगळवारी रात्री एका वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी एकाला अटक

मुंबई : देवी विसर्जनादरम्यान मंगळवारी रात्री एका वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी एकाला अटक केली आहे.राकेश गरुड असे जखमी पोलिसाचे नाव असून ते वाकोला वाहतूक शाखेत पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. जुहू बीचवर मंगळवारी रात्री देवीच्या विसर्जनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. त्या वेळी पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात येत होते. रमादान प्लाझा हॉटेलजवळ अमित सिंग राजपूत (२३) नावाचा इसम तेथील बॅरिकेड्स हटविण्यावरून पोलिसांशी वाद घालू लागला. त्या वेळी गरुड यांनी त्याला समजावले तेव्हा त्याने त्यांना मारहाण केली. यामध्ये गरुड जखमी झाले आहेत. राजपूतला अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)