पोलिसाला चौकीतच मारहाण

By admin | Published: February 4, 2017 02:01 AM2017-02-04T02:01:02+5:302017-02-04T02:01:02+5:30

पोलीस चौकीबाहेरील कुंडी पाडल्याबाबत विचारणा करणाऱ्या पोलिसाला मारहाण झाल्याची घटना भायखळा येथे घडली. या प्रकरणी राजूराम जाधव (४२) याला शुक्रवारी

Policeman beaten up in the stunt | पोलिसाला चौकीतच मारहाण

पोलिसाला चौकीतच मारहाण

Next

मुंबई : पोलीस चौकीबाहेरील कुंडी पाडल्याबाबत विचारणा करणाऱ्या पोलिसाला मारहाण झाल्याची घटना भायखळा येथे घडली. या प्रकरणी राजूराम जाधव (४२) याला शुक्रवारी भायखळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
भायखळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माझगाव टी.टी. पोलीस चौकीसमोरील झाडाची कुंडी राजूराम जाधवने पाडली. याबाबत तेथे कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार मनोहर उकिर्डे यांनी याबाबत जाधवला विचारणा केली. त्याचा राग येऊन जाधवने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
अन्य पोलिसांनी वेळीच त्याच्या तावडीतून सुटका करत जाधवला ताब्यात घेतले. उकिर्डे यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून जाधवला अटक करण्यात आली
आहे, या प्रकरणी भायखळा
पोलीस अधिक तपास करत
आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Policeman beaten up in the stunt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.